बॉलिवूडच्या ‘या’ मुस्लिम अभिनेत्री ज्यांना आजही लोक हिंदू मानतात!

इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की त्यांच्यापैकी काहींनी नाव बदलून प्रसिद्धी मिळवली. यादी पहा....

मान्यता दत्त – बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त हिचाही या यादीत समावेश आहे. जी 'गंगाजल' चित्रपटातील आयटम नंबरने चर्चेत आली होती. पण तुम्हाला माहीत आहे का की मान्यताचे खरे नाव दिलनवाज शेख आहे. मान्यता ही संजयची तिसरी पत्नी आहे.

तब्बू - बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तब्बूचे नावही या यादीत सामील आहे. तब्बू ही मुस्लिम आहे आणि तिचे खरे नाव तबस्सुम फातिमा हाश्मी आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. तिने 'हम नौजवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

रीना रॉय - बॉलीवूडची सुपर टॅलेंटेड अभिनेत्री रीना रॉय देखील मुस्लिम कुटुंबातील आहे. याची माहिती फार कमी लोकांना आहे. रीनाचे खरे नाव सायरा अली आहे. त्यांनी आपले नाव बदलून अभिनयात प्रवेश केला होता.
