Nitin Desai Suicide : असा होता नितीन देसाईंचा अलिशान एनडी स्टुडिओ पाहा फोटो…

1 / 10

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. देसाई यांनी आपल्या करिअरमध्ये छाया चित्रकार ते एन डी स्टुडिओचे मालक असा यशस्वी प्रवास केला आहे.

2 / 10

त्यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ सालापासून त्यांची सिनेमा कारकीर्द सुरू झाली. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या सिनेमामुळे ते खऱ्या अर्थाने चर्चेत आले.

3 / 10

परिंदा, डॉन, जोधा अकबर, अकेले हम अकेले तुम, प्यार तो होना ही था, सनम, बादशाह, मिशन कश्मीर, एक दो का चार, द लिजेंड ऑफ भगतसिंग, मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटांनी यादी अगदी मोजता न येण्या एवढी मोठी आहे. त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले.

4 / 10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1999), हम दिल दे चुके सनम, लागान, देवदास या चित्रपटांसाठी त्यांना तब्बल चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. तर त्यांनी ३ वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे.

5 / 10

एन डी स्टुडिओ हे त्यांच्या प्रदिर्घ वाटचालीतील एक मोठा पल्ला होता. नितिन देसाई यांनी त्यांचं स्वप्न असलेला एन डी स्टुडिओ 52 एकरमध्ये 2005 मध्ये निर्माण केला होता. हा स्टुडिओ एवढा भव्य आहे. त्यात इनडोईर सह आऊटडोर शुटींग देखील सहज होतं.

6 / 10

2008 साली अमेरिकेतील फिल्म स्टुडिओ 20 th सेंचुरी फॉक्सने एनडी स्टूडियो चार मजले 10 वर्षांसाठी भाड्याने घेण्याचं डील केलं होतं. धर्मिक मालिका आणि चित्रपटांचं शूटींग येथे विशेषतः केलं जात तसेच रिआलिटी शो. पर्यटक हा स्टुडीओ आवर्जुन पाहायाला जातात. हा स्टुडिओ मुंबईपासून 90 खालापुर जवळ कर्जत रोडवर आहे.

7 / 10

मात्र गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक अडचणीत होते.‘स्टुडिओ हा फ्लिम वर चालतो. मात्र, स्टुडिओ चालत नव्हता तसेच त्यांच्यावर एकूण २४९ कोटींचे कर्ज होते. कर्जाऊ दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी तारण ठेवलेली मालमत्ता जप्त करण्यास संबंधित वित्तीय संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मागणारा अर्ज दाखल केला होता.अशी भाजप आमदार महेश बालदी यांनी माहिती दिली.

8 / 10

आता या प्रकरणाला नवं वळण आलं आहे. नितीन देसाई यांनी काल रात्री दिल्लीहून आल्यानंतर काही ऑडिओ क्लिप (Audio clip) रेकॉर्ड केल्या होत्या. त्यात सुमारे चार बिझनेसमॅनचा उल्लेख असल्याचं एबीपी माझाने आपल्या वृत्तात सांगितलं.

9 / 10

नितीन देसाईगळफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आले. तिथचं देसाई यांचा व्हॉईस रेकॉर्डर होता. त्यात व्हॉईस नोट्समध्ये 4 बिजनेसमनची नावे आहेत. आर्थिक व्यवहारानंतर त्यांनी आपला कसा छळ केला, आपल्यावर कसा दबाव टाकला याचा उल्लेख आहे. त्यामुळे आता हे चार बिजनेसमन तपासाच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

10 / 10

बँका आणि फायनान्स कंपन्या सहकर्जदार आणि उत्तराधिकाऱ्याला त्यांची मालमत्ता विकल्यानंतरही कर्जाची परतफेड करण्याचा पर्याय देतात. पण सहकर्जदार आणि वारसांनाही हा पर्याय स्वीकारता येत नसेल, तर बँक कर्जापोटी ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव करते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून बँक थकबाकीची रक्कम वसूल करते. पण, आता गृहकर्ज देताना बँकांकडून विमा काढला जातो. ज्यात कर्जदार व्यक्तीचा मृत्यू झाल्यास बँक विम्याद्वारे त्याची वसुली करू शकते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube