भारतीय क्रिकेटपटूंची खूपच रंजक प्रेमकहाणी…कोण कुणाला कुठं भेटलं अन् कोण कुणाच्या प्रेमात पडलं

'चक दे इंडिया' या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेला चांगली ओळख मिळाली. तिच्या झहीर खानसोबत डेटिंगच्या अफवेची खूप चर्चा झाली होती. यानंतर, दोघेही युवराज सिंगच्या लग्नात दिसले. यानंतर झहीरने २०१७ मध्ये सागरिकाशी लग्न केले.

रोहित शर्मा आणि रितिका सजदेह अनेकदा कधी ना कधी एकत्र दिसतात. लग्नापूर्वी रितिका स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर होती. त्यामुळे दोघेही अनेकदा भेटत असत. यानंतर दोघेही मित्र बनले. रोहित आणि रितिका यांनी सुमारे ६ वर्षे एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर २०१५ मध्ये त्यांचे लग्न झाले.

युवराज सिंग आणि हेजल कीचची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. एका मुलाखतीत युवराजने सांगितले होते की, हेझल मैत्रीण होण्यासाठी त्याला अनेक महिने लागले. हेजलने तीन महिन्यांपर्यंत युवीची फेसबुकवरील फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही. दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली. यानंतर गप्पा सुरू झाल्या आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर युवराजने २०१६ मध्ये हेजलशी लग्न केले.

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि अंजलीची प्रेमकहाणी खूप रंजक आहे. १९९० मध्ये सचिन इंग्लंड दौऱ्यावरून परतला. या दरम्यान, तो मुंबई विमानतळावर अंजलीला भेटला आणि येथून त्यांची कहाणी सुरू झाली. यानंतर, १९९५ मध्ये लग्न केले. अंजली व्यवसायाने डॉक्टर आहे. ती सचिनपेक्षा सुमारे ६ वर्षांनी मोठी आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माची प्रेमकहाणी चाहत्यांना खूप आवडली. २०१३ मध्ये विराट आणि अनुष्का शर्मा पहिल्यांदा भेटले. एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान हे दोघे भेटले. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. विराट-अनुष्काचे लग्न २०१७ मध्ये इटलीमध्ये झाले.
