New Parliament : ‘नवीन संसदेची इमारत भारतीयांच्या आकांक्षा अन् स्वप्नांचे प्रतिबिंब’

- नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी संसदेच्या सभागृहात सेंगोल स्थापित करण्यात आला.
- पंतप्रधान मोदी म्हणाले, ही केवळ एक इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे.
- तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेतील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवानदन केलं आहे.
- नवीन संसदेच्या इमारतीचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
- यावेळी स्थापित करण्यात आलेल्या सेंगोलासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साष्टांग दंडवत घातला.
- नव्या संसद भवनासाठी एकूण 900 कोटी रुपये खर्च आला असून नव्या इमारतीत ८८८ खासदारांची आसन क्षमता आहे. तर राज्यसभेच्या हॉलमध्ये 384 सदस्य बसू शकतात.