जी-२० बैठकीसाठी पुणे सज्ज; प्रतिनिधींचे पुण्यात महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत

  • Written By: Published:
1 / 6

देशभरात सध्या जी-२० बैठकीसाठी अनेक देशातील प्रतिनिधी येत आहेत. पुण्यात देखील आज आणि उद्या होणाऱ्या बैठकीसाठी विविध देशांच्या सुमारे ३८ प्रतिनिधींचे आगमन झाले आहे.

2 / 6

आगमन झालेल्या प्रतिनिधींमधे जी-२० समूहाच्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, स्पेन, सिंगापूर, फ्रान्स, जपान, अर्जेंटिना, जर्मनी या सदस्य देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

3 / 6

तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय विकास आणि अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्यासाठी महत्वाच्या असलेल्या कोएलीशन फॉर डिझास्टर रेझीलीयंट इन्फ्रास्ट्रक्चर, इंटरनॅशनल फायनान्स कार्पोरेशन, युरोपियन युनियन, एशिअन डेव्हलपमेंट बँक या जागतिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

4 / 6

बैठकीसाठी येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी पुणे प्रशासनाने जय्यत तयारी तयारी केली आहे. भरजरी पोशाखात ढोल ताशा वादक, तूतारी वादक पथक ठेवण्यात आले आहे. जी-२० परिषदेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम' या संकल्पनेचे फलक सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहे.

5 / 6

जी-२० परिषदेसाठी आगमन झालेल्या प्रतिनिधींचे खास महाराष्ट्रीय संस्कृतीने स्वागत करण्यात आले आहे.

6 / 6

आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या आगमनावेळी या प्रतिनिधींचे पुणेरी पगडी घालून आणि शाल देऊन तसेच ढोल ताशाच्या गजरात आणि तूतारीच्या निनादात पारंपरिक पद्धतीने प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube