जिममध्ये वर्कआउट करताना तमन्ना दिसते फिट… पाहा फोटो

तमन्ना भाटिया ही साऊथ इंडियातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मात्र तिने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्येही छाप सोडली आहे. आजकाल तमन्ना ओटीटीवर धूमाकूळ घालत आहे.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.

तमन्नाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती कधी जिममध्ये तर कधी बीचवर वाळूशी मस्ती करताना दिसत आहे.

या सगळ्या चर्चापासून दूर राहून तमन्ना आपल्या आयुष्याचा आनंद लुटताना दिसली.

चित्रपटांव्यतिरिक्त तमन्ना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. अभिनेता विजय वर्मासोबतच्या नात्यामुळे ती चर्चेत असते.

करिअरबद्दल बोलायचे झाले तर तमन्ना भाटियाने 2005 मध्ये अभिनयाच्या जगात प्रवेश केला. तिनेने चांद सा रोशन चेहरा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
