अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; बारामतीत उसळला जनसागर, त्या क्षणाचे काही फोटो
अजित पवार यांचे चुलते आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी घेतलं अंत्यदर्शन. यावेळी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. याच क्षणाचे काही हे फोटो.
बारामती, पुणे यांसह ठिकठिकाणचे अनेक लोक दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी पोहोचत आहे. सध्या तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळाल.
काल सकाळपासूनच शहरातील मुख्य रस्ते ओस पडले आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.
राज्याच्या राजकारणातील एक झंझावात आणि धडाडीचे नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आज अवघ्या महाराष्ट्रातून जनसागर लोटला.
आजा बारामती विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तिथे हे अंत्यसंस्काराचे विधी सुरु आहेत. प्रचंड मोठा जनसमुदाय आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी या मैदानावर जमला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल विमान अपघातात निधन झालं. बारामती एअरपोर्टजवळ अजितदादांच चार्टर विमान कोसळलं. हा सगळ्या महाराष्ट्रासाठी मोठा झटका आहे.
आजा बारामती विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुनेत्रा पवार यांनी दिला अखेरचा निरोप, त्यांना गहिवरून आलं.
सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत होत्या. ते दृश्य पाहिल्यानंतर अनेकांच मन भरुन आलं. काळीज गहिवरलं. आपले लाडके दादा अशी अकाली एक्झिट घेतील असं कोणालाच वाटलं नव्हतं.
अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सुप्रिया सुळे या सुनेत्रा पवारांना घेऊन आल्या. हा प्रसंग मनाला खूप वेदना देणारा होता. सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत तर सुप्रिया सुळे बहिण आहे.
या अपघातामागे काही राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका कोलकात्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
News Photo 2026 01 29T115950.379
