2023 मध्ये रिलीज होणार ‘हे’ दाक्षिणात्य चित्रपट

पुष्पा : द रूल 2021 मधील अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट पुष्पा : द राइजचा सिक्वेल पुष्पा : द रूल हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट 2022 मध्येच रिलीज होणार होता. तर केजीएफच्या प्रचंड यशानंतर दिग्दर्शकाने निर्मात्यांना फायटींग सीन्स वाढवण्याची मागणी केली आहे.

आदिपुरूष : दिग्दर्शक ओम राउत यांचा आदिपुरूष हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे. यामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनन सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असणार आहे.

केजीएफ : चाप्टर 3 दिग्दर्शक प्रशांत नील यांचा केजीएफच्या दोन चित्रपटांच्या यशानंतर आता केजीएफ : चाप्टर 3 हा चित्रपट सप्टेंबर 2023 मध्ये रिलीज होणार आहे. तर प्रेक्षक देखील यशच्या अॅक्शनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

इंडियन 2 ज्येष्ठ अभिनेते कमल हसन आणि सुकन्या यांची प्रमुख भुमिका असणारा इंडियन 2 हा चित्रपट 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आले येणार आहे. या अगोदर दिग्दर्शक शंकर यांचा उलगनायगन हा चित्रपट जगभारात धुमाकुळ घालत आहे.
