केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन; मोहोळ, शेलारांसह नेत्यांकडून स्वागत
Union Home Minister Amit Shah यांचे आज रात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने आगमन झाले.
- केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शाह यांचे आज रात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने आगमन झाले.
-
केंद्रीय मंत्री शाह यांचे स्वागत सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार अमित साटम यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
- या वेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, तसेच राजशिष्टाचार विभाग व पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
- केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शाह हे आज मुंबईमध्ये भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं उद्धाटन करणार आहेत.




