आजच्याच दिवशी अमेरिका हादरुन गेली होती; नेमकं काय घडलं होतं?

आजच्याच दिवशी अमेरिका हादरुन गेली होती; नेमकं काय घडलं होतं?

अमरिकेत 11 सप्टेंबर हा दिवस काळा दिवस मानला जातो, कारण याच 2001 साली याच दिवशी अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर धडकावल्याची घटना घडली होती. दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी विमानांचं हायजॅक करुन ट्विन टॉवर्सवर धडकावले होते. या घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. घटनेमुळे जगभरात एकच खळबळ उडाली होती. आज या घटनेला 22 वर्षे पूर्ण झाली आहेत, घटनेच्यादिवशी नेमकं काय घडलं होतं? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

G20 Summit 2023: G20 शिखर परिषदेसाठी 4 हजार 254 कोटींहून अधिक खर्च, संपूर्ण तपशील पाहा

नेमकं काय घडलं होतं?
अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या काही दहशतवाद्यांनी अमेरिकेत जाणारी विमाने हायजॅकक करण्यात आली होती. त्यानंतर दहशवाद्यांनी 11 सप्टेंबर 2001 रोजी सकाळी 8 : 30 वाजता हीच हायजॅक केलेली विमानं वर्ल्ड ट्रेड सेंटरवर धडकावण्यात आली होती. ही विमाने धडकल्यानंतर 110 मजली इमारत पत्ते पडावे अगदी हुबेहूब तशीच कोसळल्याची दृश्ये अमेरिकेत पाहायला मिळाली होती. या घटनेनंतर हा दहशतवाद्यांचा हल्ला असल्याचं समोर आलं होतं.

शिवाजी कर्डिलेंसह मुलगा गोत्यात; धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश

हा हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी 4 विमांनाना हायजॅक केलं होतं. या 4 विमानांपैकी दहशतवाद्यांकडून दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये तर इतर विमानं संरक्षण विभागाचं मुख्यालय पेंटागॉनमध्ये धडकलं होतं. अमेरिकन विमान क्रमांक 11 हे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीला धडकावून हल्ला केला होता. त्यानंतर 9 : 3 वाजता दुसरे 175 क्रमांकाचंही विमान याच सेंटरच्या दक्षिण टॉवरवर धडकलं होतं.

मोठी बातमी : सरकारचा प्रस्ताव मान्य नाही; उपोषण सुरूच राहणार – मनोज जरांंगे

एकापाठेपाठ दोन विमानांनी ट्विन टॉवर्सला जोरदार धडक दिल्याने इमारत कोसळली होती. त्यानंतर दहशतवाद्यांकडून तिसरा हल्ला अमेरिकेच्या संरक्षण विभागाचं मुख्यालय पेंटागॉनमध्ये रात्री 10: 03 च्या सुमारास करण्यात आला होता. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये 2974 नागरिकांसह 19 दहशतवाद्यांना आपला प्राण गमवावा लागला होता. या हल्ल्यामागचा मुख्य सुत्रधार ओसामा बिन लादेन असल्याचं उघड झालं.

‘मराठ्यांचे ओबीसीकरण करू नका, अन्यथा…’; विदर्भ तेली समाज महासंघाचा इशारा

दरम्यान, अमेरिकेने तब्बल 10 वर्षांनंतर या हल्ल्याचा बदला घेतला आहे, हल्ल्यामागचा मुख्य सुत्रधार असलेला ओसामा बिन लादेनला जिवंत पकडून गोळ्या घालून ठार केलं होतं. लादेनला पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमध्ये पकडून तिथंच अमेरिकन सैन्याकडून त्याची हत्या करण्यात आली होती.

दहशतवादी हल्ल्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 2011 मध्ये अमेरिकन सैनिकांनी ओसामा बिन लादेनला जिवंत पकडले आणि त्याला गोळ्या घालून ठार केले. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर ओसामा सापडला आणि तिथेच त्याची हत्या करण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube