पशुपतीनाथाचा नवस फेडण्यासाठी नेपाळला पण विमान अपघात झाला अन्

  • Written By: Published:
पशुपतीनाथाचा नवस फेडण्यासाठी नेपाळला पण विमान अपघात झाला अन्

नवी दिल्ली : रविवारी झालेल्या नेपाळ विमान अपघातात उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील ४ तरुणांचा मृत्यू झाला आहे. चौघांचीही एकमेकांशी घट्ट मैत्री होती. नेपाळ विमान अपघातात बळी गेलेले सोनू जैस्वाल, अनिल राजभर, विशाल शर्मा आणि अभिषेक कुशवाह यांची लहानपणापासूनच घट्ट मैत्री होती.

त्यांच्या गावांमधील अंतर फक्त तीन किमी आहे. जहूराबाद बाजारपेठेला लागून असल्याने या सर्वांची येथे अनेकदा भेट होत असत. सोनू इतर मित्रांच्या तुलनेत श्रीमंत होता. त्यांनी तिघांनाही स्वखर्चाने नेपाळला नेले आणि सर्व मित्र मिळून अचानकच जगाचा निरोप घेतला.

आरडी मेमोरियल पब्लिक स्कूल, अलवलपूरचे संचालक प्रदीप सिंह कुशवाह यांनी सांगितले की, चारही मुले येथेच शिकली होती. इयत्ता नववीत चौघेही मित्र झाले. स्थानिक लोकांवर विश्वास ठेवला तर कधी-कधी ते एकमेकांशी भांडायचे पण काही दिवसातच त्यांची पुन्हा एकदा मैत्री झाली. काळ बदलत गेला पण त्यांची मैत्री अशीच चालू राहिली. सोनू जैस्वाल कामानिमित्त अनेकदा बाहेर असायचा, पण मित्रांच्या संपर्कात राहायचा. चारपैकी फक्त सोनूचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते.

अनिल राजभर हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत होता. गावातच त्याचे पान आणि कॉम्पुटरचे दुकान होते. तसेच अभिषेक कुशवाह हा देखील धारवा येथील रहिवासी आहे. नेपाळमध्ये विमानाने प्रवास करण्याचे त्यांचे स्वप्न होते. सोनूने काही दिवसांपूर्वी नेपाळला जाण्याचा प्लॅन केला तेव्हा सर्वांनी होकार दिला. सोनूने सर्वांना स्वखर्चाने प्रवास करून दिला.

नेपाळमधील पोखरा विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चकझैनाब येथील सोनू जयस्वाल याने 6 महिन्यांपूर्वी मुलगा झाल्यानंतर पशुपतीनाथाच्या दर्शनासाठी नवस मागितला होता. सोनूच्या दोन मुली आराध्या आणि अनामिका नंतर नुकताच मुलगा जीवनदीप झाला. सोनूचे कुटुंबीय आणि गावप्रमुख विजय जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार की, आपल्या मुलाच्या जन्मानंतर सोनूने नेपाळमध्ये पशुपतीनाथाच्या दर्शनासाठी नवस मागितला होता. बहुधा हेच साध्य करण्यासाठी तो पोहोचला होता. दर्शनानंतर ते आजूबाजूची परिसर पाहायला देखील निघाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube