पाकिस्तानमध्ये पक्षाच्या बैठकीत भीषण स्फोट, प्रमुख नेत्यांसह 35 ठार
Bomb Blast Pakistan : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्हात देशाला हादरवणारी एक घटना घडली आहे. बाजौर जिल्ह्यातील खार तालुक्यातील एका राजकीय पक्षाच्या मेळाव्यात मोठा बॉम्बस्फोट (Bomb Blast) झाला. या स्फोटात 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 200 जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी बैठकीला लक्ष्य करून हा स्फोट घडवला. पोलीस आणि स्थानिक नागरिक बचावकार्यात गुंतले आहेत, तर जखमींना घटनास्थळावरून रुग्णालयात हलवण्यात येत आहे. पोलीस मदतकार्यात गुंतले आहेत. (bomb blast at political party meeting in Pakistan 35 killed death toll likely to increase)
बाजौरचे जिल्हा आपत्कालीन अधिकारी साद खान यांनी मृत आणि जखमींच्या संख्येची पुष्टी केली. खान म्हणाले की, खार स्फोटात JUI-F प्रमुख मौलाना झियाउल्लाह जान यांचाही मृत्यू झाला होता. पोलिसांनी सांगितले की, 200 हून अधिक लोक जखमी झाले असून मोठ्या संख्येने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात पाकिस्तानी न्यूज वेबसाइट जिओ न्यूजचा एक कॅमेरामनही जखमी झाला आहे.
#UPDATE | At least 35 killed, 200 injured in suicide blast targeting JUI-F workers' convention in Bajaur, reports Pakistan's Geo English https://t.co/8RrO1a7YrF
— ANI (@ANI) July 30, 2023
पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) च्या राजकीय पक्षाच्या मेळाव्यात हा स्फोट झाला. मात्र, आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
स्फोटानंतरचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. जखमी आणि मृतांचा आकडाही वाढू शकतो. पाकिस्तानी न्यूज चॅनल समा टीव्हीशी बोलताना, जेयूआयएफचे वरिष्ठ नेते हाफिज हमदुल्ला यांनी जखमींसाठी आपत्कालीन वैद्यकीय उपाययोजना सुनिश्चित करण्याची सरकारला विनंती केली.
मी शिर्डीत..म्हणूनच कोल्हापुरचा पूर टळला, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचा अजब दावा…
त्याचवेळी एका वरिष्ठ स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, हा स्फोट कसा झाला याबाबत काहीही सांगता येणार नाही. माहिती गोळा केली जात असल्याचे अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले. या स्पोटानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला असून पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. बचावकार्य सुरू आहे.
तर प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोट इतका जोरदार होता की सुमारे 3 किलोमीटरपर्यंत परिसर हादरला. दरम्यान, या स्फोटाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.