कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार हाय अलर्ट, उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान मोदींच्या सूचना
नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भारतात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना नवा व्हेरियंटचा उद्रेक झाल्याचं चित्र चीनमध्ये दिसून येत आहे. मात्र, भारतात अद्याप या नव्या व्हेरियंटचा अधिक प्रादुर्भाव दिसून येत नसून आत्तापर्यंत चार जणांना या नव्या व्होरियंटची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
आज गुरुवारी 22 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना नियमांच पालन करण्याबाबत सूचना दिल्या असून आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती दिलीय.
PM Modi reviews COVID-19 situation at high-level meeting
Read @ANI Story | https://t.co/CeQGTyfJY9#COVID19 #covidindia #India #PMModi pic.twitter.com/ke3fQlwlJ3
— ANI Digital (@ani_digital) December 22, 2022
तसेच आत्तापर्यंत आपल्या देशात चार जणांना नव्या व्हेरियंटची लागण झाल्याची माहिती मिळालीय. देशभरातील नागरिकांनी सतर्कता बाळगत लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून करण्यात आलंय. तसेच चीनमध्ये एकूण दहा वेगवेगळे व्हेरियंट आढळून आले असून त्यापैकी एक हा नवा व्हेरियंट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
जगभरासह देशात कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नसून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे कोरोना विषाणुशी लढण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याचंही त्यांनी म्हंटलयं.
या नव्या व्हेरियंटचा चीनसह इतर देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उद्रेक होत असल्याची परिस्थिती असून विमानतळांवर थर्मल स्क्रिनिंग सुरु करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले आहेत. अमेरिका, चीन, जपान, दक्षिण कोरिय, फ्रान्ससह इतर देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
दरम्यान, ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून या बैठकीला केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री अमित शाह, नीती आयोगाचे सीईओ परमेश्वरन अय्यर यांच्यासह आदी उपस्थित होते.