सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनविता, तर तुमच्याकडे डिग्री आहे का ? ; चीनने आणला नवा नियम
China Bans Influencers: नियमानुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कंटेट क्रिएटर्स आणि इन्फ्लूएंसरची प्रमाणपत्र, पदवी (डिग्री) तपासली जात आहे.
China Bans Influencers Without Diplomas: सोशल मीडियावर अनेकदा संबंधित विषयाचे ज्ञान नसताना दुसरीकडून माहिती घेऊन रील, व्हिडिओ बनविले जातात. आर्थिकबाबी, आरोग्य, कायदा, शिक्षण याबाबत चुकीची माहिती दिली जाऊ शकते. त्यात अर्धवट ज्ञानातून धोकाही निर्माण होऊ शकते. तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकते. त्याला अटक घालण्यासाठी आता चीनमध्ये एक नियम आणला आहे. त्यानुसार पदवी किंवा डिप्लोमा असलेले एन्फ्लुएंसर्स असे रील, व्हिडिओ बनवू शकतात. नवा नियमानुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कंटेट क्रिएटर्स आणि इन्फ्लूएंसरची प्रमाणपत्र, पदवी (डिग्री) तपासली जात आहे. (China Bans Influencers Without Diplomas)
नियमांचे उल्लंघन केल्यास अकाउंट डिलीट
जो व्यक्ती नियमाचे उल्लंघन करेल, त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्या व्यक्तीचे सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले जाणार आहेत. तसेच त्याला बारा लाख रुपयांचा दंडही ठोठावला जाईल.
हा नियम सर्वांसाठी आहे का ?
हा नियम सर्वांना लागू नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मावरून आर्थिक म्हणजे शेअर बाजार, गुंतवणूक, औषध, कायदा किंवा शिक्षण यासारख्या महत्त्वाचा विषयावर व्हिडिओ बनविणाऱ्या व्यक्तींना लागू आहे. या विषयांमध्ये व्यावसायिक प्रमाणपत्रे असलेली व्यक्तीचं असे रील किंवा व्हिडिओ तयार करू शकतो. त्यानुसार या व्यक्तींच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.
कोणावर जबाबदारी ?
अलीकडेच लागू केलेल्या धोरणात डॅयिन, वेइबो आणि बिलिबिली यासारख्या प्रमुख प्लॅटफॉर्मवर कायदेशीर जबाबदारी टाकण्यात आली आहे. हे प्लॅटफॉर्म विषयांवर बोलणाऱ्या निर्मात्यांची पात्रता तपासतील आणि रेकॉर्ड करतील. नवीन निर्देशानुसार नियमांचे पालन न करणाऱ्या प्लॅटफॉर्मना एक लाख युआपर्यंत दंड ठोकला जाणार आहे.
औपचारिक शिक्षण नसल्यामुळे मोठे घोळ
संबंधित विषयाचे ज्ञान नसलेले कंटेट क्रिएटर्स हे वैद्यकीय टिप्स, गुंतवणूक शिफारशी, कायदेशीर ज्ञान देत आहे. परंतु या क्रिएटर्सबद्दल सरकारकडे तक्रारी येत आहेत. त्यानुसार चायना कंझ्युमर्स असोसिएशनने एक सर्व्हे केलाय. त्यात तीस टक्के वापरकर्त्यांना आरोग्यसंदर्भात फसवी माहिती मिळाली आहे.
सोशल मीडिया उद्योग मोठा
चीनमध्ये सोशल मीडिया उद्योग मोठा आहे. लाइव्हस्ट्रीमिंगशी संबंधित ई कॉमर्स विक्री 2022 मध्ये 165 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती. हा नियम लागू केल्यानंतर अनेक निर्मात्यांनी आपले व्हिडिओ सोशल मीडियावर हटविले आहेत. तसेच पर्यायी वैद्यकीय उपायांना प्रोत्साहन देणारे, परवाना नसलेले आर्थिक सल्ले देणाऱ्यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद केले आहेत.
