काय सांगता! वादळाच्या भीतीनं शाळा, कॉलेज अन् रेल्वे बंद; वाचा, कुठं ओढवलयं संकट?

China News : चीनच्या सरकारने देशातील लाखो लोकांना एक इशारा (China News) जारी केला आहे. या वीकेंडमध्ये लोकांनी घरातच राहायला पाहीजे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना लवकर घरी जाण्यास सांगितले आहे. इतकेच काय तर स्कूल कॉलेज देखील बंद करण्यात आले आहेत. 50 किलो वजन असणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी असाही इशारा दिला आहे. या सगळ्या मागं नेमकं काय कारण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेलचं. खरंतर चीनमध्यये या आठवड्याच्या शेवटी जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे. या वाऱ्यात कमी वजनाची माणसे उडून जाण्याची भीती आहे.
शुक्रवारपासून आज रविवारपर्यंत बीजिंग, तियानजिन आणि हेबेई या शहरांत 150 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील. शेजारील देश मंगोलियातून दक्षिण पूर्वेकडे थंड वारे वाहत आहेत. यानंतर चीनची राजधानी बीजिंग शहरात वादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दशकभरात असे पहिल्यांदाच घडत आहे.
अमेरिकेच्या टॅरिफनंतर चीनची नवी चाल, युरोपीय देशांनाच ओढणार जाळ्यात; नेमकं काय घडलं?
मंगोलियातून येणारे वारे सामान्य नाहीत. वर्षभरातील वाऱ्यांच्या तुलनेत हे वारे जास्त वेगवान असण्याची शक्यता आहे. बीजिंग हवामान विभागाचे म्हणणे आहे की वारे अतिशय वेगवान असतील. वारे बराच वेळ वाहत राहतील. यामुळे मोठ्या भागावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. चीनमध्ये वाऱ्यांचा वेग 1 ते 17 या पद्धतीने मोजला जातो. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी नऊ वाजता बीजिंगच्या दोन प्रमुख विमानतळांवरील तब्ब्ल 838 उड्डाणे रद्द करण्यात आली होती.
चीन हवामान विभागाच्या मते या वीकेंडमध्ये 11 व्या स्तरातील वारे वाहतील. यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. 12 व्या पातळीवरील वारे अत्याधिक विनाशकारी असतात. या वीकेंडमध्ये वाहणारे वारे 11 ते 13 पातळीतील असण्याची शक्यता आहे. यामुळे काही क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. पार्क आणि पर्यटक केंद्र देखील बंद करण्यात आले आहे. इतकेच नाही तर शहरे आणि आसपासच्या भागांतील बांधकामे, रेल्वे सेवा देखील बंद करण्यात आल्या आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’ ब्रेक मागे वेगळाच प्लॅन; चीनवर दबाव अन् जगभरात बिजनेस डील..