मोठी बातमी, तालिबान-पाकिस्तानमध्ये संघर्ष; 12 पाकिस्तानी सैनिक ठार

Taliban and Pakistan Clashes : भारताच्या शेजारी असणारे तालिबान आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष वाढला असून सध्या समोर आलेल्या

  • Written By: Published:
Taliban And Pakistan Clashes

Taliban and Pakistan Clashes : भारताच्या शेजारी असणारे तालिबान आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष वाढला असून सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल आणि इतर ठिकाणी हवाई हल्ले केले. अफगाण सैन्याने प्रत्युत्तरात 12 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आहे.

शुक्रवारी पाकिस्तानने आफगाणिस्तानची राजधानी काबूल (Taliban and Pakistan Clashes) आणि इतर काही ठिकाणी हवाई हल्ले केले होते. या हल्ल्याना प्रत्युत्तर म्हणून अफगाण सैन्याने डुरंड रेषे जवळ हल्ला करत पाकिस्तानचे 12 सैनिक ठार केले आहे.

माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानच्या 201 खालिद बिन वलीद आर्मी कॉर्प्सने (Khalid bin Waleed Army Corps) नांगरहार आणि कुनार प्रांतातील डुरंड रेषेजवळील (Durand Line) पाकिस्तानी लष्करी चौक्यांना टार्गेट केले. तालिबान सरकारने टोलो न्यूजला सांगितले की इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानवर मोठे आक्रमण केले आणि या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्या. त्यांनी असा दावाही केला की कुनार आणि हेलमंड प्रांतातील अफगाण सीमेवरील काही पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.

मी लय भोळा दिसत असेल…पण तसा नाय; घरावर झालेल्या हल्ल्यानंतर बाबासाहेब देशमुख आक्रमक

follow us