भारत जोडो यात्रेदरम्यान खासदारांचा मृत्यू
नवी दिल्लीः राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली. यात्रेत चालताना काँग्रेसचे खासदार संतोखसिंह चौधरी यांना अचानक छातीत दुखू लागले.अस्वस्थ वाटू लागले. आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. संतोखसिंह चौधरी यांना ह्द्यविकाराचा झटका आल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. मात्र उपचारादरम्यान संतोखसिंह यांचा मृत्यू झाला.
खासदार संतोखसिंह चौधरी भारत जोडो यात्रेत चालत होते. त्यावेळी चालत असताना संतोख सिंह यांची प्रकृती खालावली. संतोखसिंह यांना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांचं निधन झालं असल्याचं सांगितलं आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं असल्याचं समोर आलं आहे. ही माहिती मिळताच राहुल गांधी रुग्णालयात दाखल झाले होते.
भारत जोड़ो यात्रा के दौरान जालंधर के सांसद संतोख सिंह चौधरी जी के आकस्मिक देहांत से हम स्तब्ध हैं।
ईश्वर उनकी आत्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें और उनके परिवार को इस क्षति को सहने का साहस प्रदान करे। pic.twitter.com/RnQTz3qzza
— Bharat Jodo Nyay Yatra (@bharatjodo) January 14, 2023
भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. आज लुधियानातील लाडोवाल टोल प्लाझा येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. ती फगवाड्याच्या दिशेने जात होती. यात्रेत खासदार संतोखसिंह चौधरी हेदेखील राहुल गांधींच्या जथ्थ्यासोबत चालत होते.
मात्र सकाळी 8.45 वाजेच्या सुमारास संतोखसिंह चौधरी यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांच्या छातीत दुखू लागले. यात्रेतील रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना तत्काळ फगवाडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संतोख सिंह चौधरी हे 76 वर्षांचे होते.