ट्विटर युजर्सचा डेटा चोरीला गेल्याची माहिती समोर, ईमेल आयडी लीक झाल्याचा दावा
नवी दिल्ली : जवळपास 200 दशलक्षपेक्षा अधिक ट्विटर वापरकर्त्यांचा डेटा चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा दावा एका रिपोर्टमधून करण्यात आला असून सुरक्षा संशोधनाच्या अहवालानूसार 200 दशलक्षपेक्षा अधिक वापरकर्त्यांचा डेटा चोरीला गेलाय.
याबाबत अधिक माहिती अशी की, युजर्सच्या मोबाईलमधून ईमेल आयडी चोरुन एका ऑनलाईन फोरममध्ये पोस्ट केले आहेत. ब्रीच-नोटिफिकेशन साईट हॅव आय बीन प्वेन्डचे निर्माते ट्राय हंट यांच्या माहितीनूसार 200 दशलक्ष ट्विटर युजर्सचा ईमेल आयडी चोरीला गेल्याची माहिती समोर आलीय. हा सर्व प्रकार एका हॅकरकडून करण्यात आलाय.
ट्विटर वापरकर्त्यांची माहिती चोरीला गेली असून यामुळे बरेच हॅकिंग, टार्गेट फिशिंग, डॉक्सिंग घटनेत वाढ होणार आहे. गॅल यांनी 24 डिसेंबरला सोशल मिडियावर ट्विटर युजर्सचा डेटा लीक झाल्यबद्दल पोस्ट करत माहिती दिली असून गॅल यांनी सांगितलं होतं की, मोठ्या प्रमाणात ट्विटर वापरकर्त्यांची माहिती चोरीला जात आहे.
दरम्यान, ट्विटरकडून या समस्यांची चौकशी किंवा समस्या सोडवण्यासाठी काय कारवाई केली? यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नसून ब्रीच-नोटिफिकेशन साइट हॅव आय बीन प्वेन्डचे निर्माते ट्रॉय हंट यांच्या माहितीनुसार, 200 दशलक्ष ट्विटर युजर्सचा ईमेल आयडी चोरीला गेला आहे.