ब्रेकिंग : बांगलादेश न्यायालयाचा मोठा निर्णय; माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा

बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने शेख हसीनाविरुद्ध निकाल दिला आहे. न्यायालयाने जुलैच्या उठावामध्ये हसीनाला दोषी ठरवले आहे आणि तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

  • Written By: Published:
ब्रेकिंग : बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना कोर्टाकडून फाशीची शिक्षा

Bangladesh Ex-PM Sheikh Hasina sentenced to death for ‘crimes against humanity’ : आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्ध गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आहे. या प्रकरणात तीन न्यायाधीशांच्या न्यायाधिकरणाने शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती गुलाम मुर्तझा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या न्यायाधिकरणाने एकूण ४०० पानांचा सहा भागांमध्ये निकाल दिला. जुलै 2024 च्या उठावादरम्यान नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार करण्यास हसीनावर चिथावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. निकाल देताना न्यायालयाने हसीना यांचा एक ऑडिओ रेकॉर्डिंगदेखील जारी केले, जे बांगलादेशात व्हायरल झाले होते. या ऑडिओमध्ये हसीना पोलिस प्रमुखांना लोकांवर गोळीबार करण्यास सांगताना ऐकू येते. न्यायालयाने निकाल देताना मानवाधिकार आयोगाच्या अहवालाचाही हवाला दिला.

हसीनांविरुद्ध 458 पानांचा निकाल

जुलैच्या उठावादरम्यान झालेल्या मृत्यूंसाठी शेख हसीना पूर्णपणे जबाबदार असल्याचे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने सरकारी वकिलांनी सादर केलेले पुरावे देखील सादर केले. आयसीटीने शेख हसीनाविरुद्ध 458 पानांचा निकाल दिला. निकालात म्हटले आहे की, जानेवारी 2024 पासून हसीना हुकूमशहा बनण्याच्या तयारीत होती. जानेवारी 2024 च्या निवडणुकीत हसिना यांनी विरोधकांना चिरडून टाकले. त्यानंतर, जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरले तेव्हा तिने त्यांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले.

या प्रकरणात हसिना कशा अडकल्या?

जुलैच्या उठाव प्रकरणात बांगलादेश सरकारने पदच्युत पंतप्रधान शेख हसीना, माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल आणि माजी पोलिस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामुन यांना आरोपी केले. आंतरराष्ट्रीय न्यायालयात जेव्हा या तिघांविरुद्ध खटला सुरू झाला तेव्हा अल-मामुनने विरोधी भूमिका घेतली. अल-मामूनने हसीनाविरुद्ध साक्ष देण्याची धमकी दिली. दरम्यान, पोलिस प्रमुखांशी बोलताना हसीनाचे ऑडिओ रेकॉर्डिंग समोर आले. ऑडिओची पुष्टी होताच, हसीनांविरुद्धचा खटला जलदगतीने सुरू करण्यात आला.

follow us