Joe Biden FBI Raid: एफबीआयकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या घराची झाडाझडती

Joe Biden FBI Raid: एफबीआयकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या घराची झाडाझडती

वॉशिंग्टन : एफबीआयनं (FBI)बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden)यांच्या डेलावेअरमधील बीच हाऊसची (Beach House)झाडाझडती घेतली आहे. यावेळी एफबीआयला कोणत्याही प्रकारची गोपनीय कागदपत्रं सापडली नाहीत. अध्यक्ष बायडन यांचे वैयक्तिक वकील बॉब बाऊर (Bob Baur) यांनी सांगितलं की, एफबीआयनं या प्रकरणात हस्तलिखित नोट घेतली आहे.

एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीनं राष्ट्राध्यक्षांच्या वैयक्तिक वकिलाच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, अध्यक्षांच्या वकिलांच्या समन्वयानं आणि सहाय्यानं राष्ट्राध्यक्षांच्या बीच हाऊसमधील एफबीआयची शोध मोहीम संपली आहे. सकाळी साडेआठ ते दुपारपर्यंत छापा टाकण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

गेल्या महिन्यात विल्मिंग्टनमधील राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या घरातील झडतीबाबत वकील म्हणाले की, एजंटांनी पुढील पुनरावलोकनासाठी काही साहित्य आणि हस्तलिखीत नोट्स घेतल्या आहेत, ज्या त्यांच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या काळाशी संबंधित आहेत. ते म्हणाले की, घराचा झाडाझडती नियोजित होती आणि त्याला बायडन यांचं पूर्ण समर्थन आणि सहकार्य होतं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

राष्ट्राध्यक्ष बायडन यांचे वैयक्तिक वकील बॉब बाऊर यांनी यापूर्वी अहवाल दिला होता की यूएस न्याय विभागानं विल्मिंग्टन, डेलावेअर येथील राष्ट्राध्यक्षांच्या घरातून आणखी सहा गोपणीय कागदपत्रं जप्त केली आहेत. त्यातील काही दस्तऐवजांमध्ये अमेरिकेच्या सिनेटमधील बायडन यांच्या कार्यकाळाचा उल्लेख आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube