बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना फाशीची शिक्षा सुनावली; 2024 चं हिंसाचार प्रकरण नेमकं काय?
Bangladesh Prime Minister Sheikh Hasina यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण ज्या प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावली ते प्रकरण नेमकं काय?
Former Bangladesh Prime Minister Sheikh Hasina sentenced to death; What exactly is the 2024 violence case : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. यामध्ये शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर 2024 च्या हिंसाचार प्रकरणात मानवतेविरोधी कृत्य केल्याचे आरोप होते. जस्टीस गुलाम मूर्तजा यांच्या तीन सदस्य खंडपीठाकडे ही सुनावणी पार पडली. पण ज्या 2024 च्या हिंसाचार प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावली ते प्रकरण नेमकं काय?
नेमकं प्रकरण काय?
बांगलादेशमध्ये गेल्यावर्षी 5 ऑगस्ट 2024 रोजी विद्यार्थ्यांचं एक आंदोलन झालं होतं. ज्या आंदोलनाने शेख हसीना यांच्या आवामी लीगचे सरकार पाडण्यात आले. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी देशाची राजधानी ढाकामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार जाळपोळ आणि निदर्शनं केली होती. त्यामुळे शेख हसीना यांनी आंदोलकांवर हिसाचार केला होता. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न आणि छळ तसेच मानवते विरोधी कृत्यांच्या आरोप करण्यात आले होते.
आम्ही तुम्हाला मानणाऱ्यापैकी एक होतो पण…, मुंडेंच्या चौकशी टाळाटाळवरून जरांगेंची फडणवीसांवर नाराजी
दरम्यान विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सरकारी नोकरीतील आरक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी छेडण्यात आलं होतं. कारण या आरक्षणामध्ये अनियमितता होती. बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या कायद्यानुसार 56 टक्के सराकरी नौकऱ्या आरक्षित आहेत. यातील 30 टक्के 1971 च्या मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांसाठी राखीव आहे. 10 टक्के मागास प्रशासकीय जिल्ह्यांसाठी राखीव आहे. 10 टक्के महिलांसाठी राखीव आहे. 5 टक्के अल्पसंख्यांक आणि 1 टक्का दिव्यांगांसाठी आहे.
ब्रेकिंग : बांगलादेश न्यायालयाचा मोठा निर्णय; माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा
मात्र यातील 30 टक्के आरक्षण जे 1971 च्या मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांसाठी राखीव आहे. त्यात सरकार फक्त त्यांच्या समर्थकांनाच या कोट्यातून आरक्षण देत आहे. त्यांनी मेरिटच्या आधारावर हे आरक्षण द्यावं. याच मागणीसाठी हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. पण हसीना यांच्या सरकारने हे आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी पोलीस आणि बळाचा वापर केला. त्यात असंख्य लोक मारले गेले.
750 CIBIL स्कोअर तरीही बँकेने कर्ज नाकारलं? RBI ने सांगितली रिजेक्ट होण्याची कारणं
दरम्यान या आंदोलनामध्ये असंख्य नागरीक मृत्यूमुखी पडले होते. गेल्या 15 वर्षांपासून बांगलादेशमध्ये सरकार चालवत असलेल्या शेख हसीना यांनी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि देश सोडला होता. त्यानंतर अर्थतज्ज्ञ मोहम्मद यूनुस हे बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख झाले. मोहम्मद युनूस यांना पंतप्रधानपदाचा दर्जा आहे. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत मोहम्मद युनूस सरकारचे नेतृत्व करतील.
