मोठी बातमी, अमेरिकेत माजी हाऊस स्पीकर मेलिसा हॉर्टमन यांची हत्या

मोठी बातमी, अमेरिकेत माजी हाऊस स्पीकर मेलिसा हॉर्टमन यांची हत्या

Melissa Hortman Murder  :  अमेरिकेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, शनिवारी पहाटे दोन नेत्यांना त्यांच्या घरात गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात सिनेटर जॉन हॉफमन (John Hoffman) जखमी झाले आहे तर माजी हाऊस स्पीकर मेलिसा हॉर्टमन (Melissa Hortman) आणि त्यांचे पतीची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु केला असून हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात होता असा संशय पोलिसांना आहे.

या प्रकरणात मिनेसोटाचे पोलिस प्रमुख ब्रुकलिन पार्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना संशयिताच्या गाडीत एक पेपर सापडला आहे. या पेपरवर अनेक सिनेटर (खासदार) आणि अधिकाऱ्यांची नावे आहेत. या पेपरवर असणारे नावे संशयिताच्या हिटलिस्टवर असतील असा संशय पोलिसांना असल्याची माहिती मिनेसोटाचे पोलिस प्रमुख ब्रुकलिन पार्क यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मिनेसोटातील गोळीबाराला भयानक म्हटले आहे. तसेच हे अजिबात सहन केले जाणार नाही असं देखील त्यांनी म्हटले आहे. तर अमेरिकेचे ॲटर्नी जनरल पाम बोंडी म्हणाले की, ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणात एफबीआय तपासात मदत करत असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे.

या प्रकरणात तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना असा संशय आहे की, हल्ला करणारा आरोपी पोलीस गणवेशात घरात दाखल झाला होता. पोलिस प्रमुख मार्क ब्रुली म्हणाले, संशयित ज्या गाडीचा वापर करत होता ती गाडी अगदी एसयूव्ही स्क्वॉड कारसारखी दिसत होती. त्यातइमरजेंसी लाईट्स आणि इतर पोलीस वाहनांसारख्या सुविधा होत्या.

मोठी कारवाई, मध्य प्रदेशात चकमकीत तीन महिलांसह 4 नक्षलवादी ठार

पोलिसांनी संशयिताच्या गाडीतून एक पेपर जप्त केला ज्यामध्ये अनेक सिनेटर आणि अधिकाऱ्यांचे नाव आहे. ज्यामुळे मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र आतापर्यंत  हल्ल्यामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही आणि तपास अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube