22 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! आता बदलता येणार तुमचा Gmail ID; सुंदर पिचाईंची मोठी घोषणा

Sundar Pichai गुगलने एक जबरदस्त फीचर लाँच केलं असून, तुमच्या सध्याच्या अकाउंटचंच नाव म्हणजे @gmail.com च्या आधीचा भाग बदलू शकता.

  • Written By: Published:
22 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! आता बदलता येणार तुमचा Gmail ID; सुंदर पिचाईंची मोठी घोषणा

Now You Change Gmail ID Without Losing Mails Know Details : शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना घाईघाईत बनवलेला ‘coolboy2004’ किंवा ‘angel_priya’ सारखा ईमेल आयडी आजही वापरावा लागतोय? एखाद्या प्रोफेशनल कामासाठी हा आयडी सांगताना तुम्हाला संकोच वाटतोय का? तर आता काळजी सोडा! टेक दिग्गज गुगलने करोडो युजर्सची अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य केली असून, आता नवीन अकाउंट न उघडता तुम्हाला तुमचा मुख्य Gmail ID बदलता येणार आहे.

बँक ग्राहकांसाठी ‘अच्छे दिन’! आता मोबाईल नंबरप्रमाणे बँक खाते करता येणार पोर्ट…

स्वतः गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका मिश्किल पोस्टद्वारे ही खूशखबर दिली आहे. पिचाई यांनी म्हटले की, “२००४ हे वर्ष नक्कीच चांगलं होतं, पण तुमची डिजिटल ओळख आजही त्याच वर्षात अडकून राहण्याची गरज नाही. आता जुने ईमेल आयडी सोडून तुम्ही उपलब्ध असलेले कोणतेही नवीन नाव निवडू शकता. Now You Change Gmail ID Without Losing Mails Know Details

जुना ईमेल आयडी आणि डेटाचे काय होणार?

पिचाई यांच्या या अपडेट नंतर अनेकांना अशी भीती वाटते की, ईमेल आयडी बदलल्यास जुने मेल्स किंवा फोटो डिलीट होतील का? पण गुगलने याबाबत मोठे आश्वासन दिले आहे.

  • डेटा सुरक्षित: तुमचा जुना ईमेल आयडी तुमच्याच अकाउंटला कायमचा लिंक राहील. तो आयडी गुगल दुसऱ्या कोणालाही देणार नाही.

  • इनबॉक्स एकच: जरी तुम्ही नवीन आयडी सेट केला, तरी जुन्या आयडीवर येणारे सर्व मेल्स तुमच्या नवीन इनबॉक्समध्येच जमा होतील. यामुळे तुमचे महत्त्वाचे मेल्स मिस होणार नाहीत.

१२ महिन्यांचा’ महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा

जर तुम्ही ईमेल आयडी बदलण्याचा विचार करत असाल, तर एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. एकदा युजरनेम बदलले की, पुढचे १२ महिने (१ वर्ष) तुम्हाला ते पुन्हा बदलता येणार नाही. त्यामुळे नवीन नाव निवडताना ते विचारपूर्वक आणि स्पेलिंग तपासूनच निवडा.

कसा बदलाल तुमचा ‘बोअरिंग’ Gmail ID? (Step-by-Step)

हे फिचर तुमच्या फोनमध्ये उपलब्ध झाल्यावर खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा.

१. तुमच्या Google Account Settings मध्ये जा.
२. ‘Personal Info’ या टॅबवर क्लिक करा.
३. खाली स्क्रोल करून ‘Email’ सेक्शनमध्ये जा आणि ‘Google Account email’ निवडा.
४. येथे तुम्हाला ‘Change’ चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून नवीन उपलब्ध नाव सेट करा.

Login अन् Sign In मध्ये नेमका फरक काय?; जाणून घ्या, दोन टेक्निकल शब्दांचा खरा अर्थ

जीमेल होणार अधिक ‘स्मार्ट’; येतंय AI Inbox

केवळ ईमेल आयडीच नाही, तर गुगल आता ‘Gemini AI’ द्वारे चालणारे ‘AI Inbox’ हे क्रांतिकारी फिचर देखील लाँच करत आहे. काय असेल AI इनबॉक्समध्ये खास?

  • महत्त्वाच्या मेल्सना प्राधान्य: वीजबिल भरणे किंवा कामाच्या डेडलाईन्स असलेले मेल्स AI ओळखून ते ‘बोल्ड’ अक्षरात हायलाईट करेल.

  • ट्रॅव्हल आणि बुकिंग अपडेट्स: तुमचे हॉटेल रिझर्व्हेशन, विमानाचे तिकीट किंवा इतर बुकिंग्स एकाच स्वतंत्र सेक्शनमध्ये दिसतील.

  • ईमेल सारांश (Summary): लांबलचक ईमेल्स वाचण्याऐवजी जेमिनी एआय तुम्हाला त्या मेल्सचा थोडक्यात सारांश (Summary) काढून देईल. सध्या हे एआय फिचर अमेरिकेतील काही निवडक युजर्ससाठी सुरू झाले असून, लवकरच भारतीय युजर्सनाही आपली डिजिटल ओळख अपडेट करण्याची आणि ‘स्मार्ट’ इनबॉक्स वापरण्याची संधी मिळणार आहे.

follow us