India vs Canada : अमेरिकेकडूनच कॅनडाला निज्जरच्या हत्येची माहिती; मध्यस्थी करणाऱ्या अमेरिकेवर भारताने विश्वास ठेवावा?

India vs Canada : अमेरिकेकडूनच कॅनडाला निज्जरच्या हत्येची माहिती; मध्यस्थी करणाऱ्या अमेरिकेवर भारताने विश्वास ठेवावा?

India vs Canada : हरदीपसिंग निज्जर (Hardeep singh Nijjar) या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमुळे भारत आणि कॅनडामधील (India vs Canada) वातावरण सध्या चांगलचं तणावाचं बनलं आहे. कॅनडाने त्याच्या हत्येचा आरोप थेट भारतावर केला आहे. दुसऱ्या बाजूला दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजदुतांची हकालपट्टी केली. भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देणे अनिश्चित काळासाठी बंद केलं आहे. शिवाय व्यापारावरही गंभीर परिणाम झाला आहे. दरम्यान अशी माहिती समोर आली आहे की, भारत आणि कॅनडामध्ये मध्यस्थी करून समेट घडवून आणण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या अमेरिकेनेच कॅनडाला निज्जरच्या हत्येची माहिती दिली.

Vaibhav Tatwawadi Birthday: इंजिनिअरिंग सोडून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या वैभव तत्ववादीबद्दल काही रंजक गोष्टी…

अमेरिकेनेच कॅनडाला निज्जरच्या हत्येची माहिती दिली…

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर अमेरिकन गुप्तचर संस्थांनीच कॅनडाला त्याच्या हत्येचे पुरावे सादर केल्याचा दावा संबंधित अमेरिकन अधिकाऱ्यांनी केल्याचं वृत्त अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तसंस्थेने दिलं आहे. मात्र या अधिकाऱ्यांनी असही म्हटलं की, ही माहिती सार्वजनिक करायला दिलेली नव्हती. कॅनडाच्या पंतप्रधानांनी ती संसदेत मांडली.

ONGC Bharti 2023: पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी, ONGC मध्ये विविध पदांच्या ४४५ पदांसाठी भरती सुरू

भारताने अमेरिकेवर कितपत विश्वास ठेवावा?

दरम्यान भारत आणि कॅनडातील वाद (India vs Canada) कमी करण्यासाठी अमेरिका मध्यस्थी करत आहे. अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे. त्यासाठी अमेरिकेने भारत आणि कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांशी पाठिमागच्या दाराने चर्चा केली आसल्याची सांगण्यात येत आहे. मात्र जर अशा प्रकारे अमेरिकाच कॅनडाला निज्जरच्या हत्येची माहिती देत असेल तर भारताना अमेरिकेवर कितपत विश्वास ठेवावा असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

दुसरीकडे अमेरिकेला भारताशी असलेले संबंध बिघडू नयेत याची देखील काळजी अमेरिका घेत आहे. त्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अॅंटनी ब्लिंकन यांनी कॅनडाच्या तपासात सहहकार्य करण्याचे आवाहन भारताला केले आहे. दरम्यान अमेरिकेनेच कॅनडाला निज्जरच्या हत्येची माहिती दिली. असल्याचं समोर आल्यानंतर अमेरिकेकडून त्याची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube