सद्दामसारखं संपवायला आले अन् स्वतःच अडकले! जनरल जाफरींनी रचलेलं ते ‘चक्रव्यूह’ काय आहे?
Ali Jafari २८ फेब्रुवारी २०२६ रोजी जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने 'ऑपरेशन एपिक फ्युरी' अंतर्गत इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला कंठस्नान घातले
How Ali Jafari Made Iran Mosaic Defense System : 14 दिवसांचे युद्ध, 10 हजार क्षेपणास्त्रांचा मारा आणि इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाचा खात्मा… तरीही इराण झुकला नाही. अमेरिका आणि इस्रायल ज्या विजयाची अपेक्षा करत होते, तो अद्याप दूरच आहे. यामागे एक असा माणूस आहे ज्याने इराणला ‘अजिंक्य’ बनवले. ती व्यक्ती म्हणजे मेजर जनरल मोहम्मद अली जाफरी आणि त्यांची ‘मोजेक डिफेन्स’ सिस्टिम. ही मोजेक डिफेन्स सिस्टम नेमकी काय? जाफरींनी नेमकं काय बनवलयं ते सोप्या शब्दांत जाणून घेऊया…
28 फेब्रुवारी 2026 रोजी जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अंतर्गत इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला कंठस्नानी घातले, तेव्हा जगाला वाटले की, इराण आता पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळेल. पण, अयातुल्ला खामेनी आणि आयआरजीसीच्या मुख्य कमांडर्सचा खात्मा झाल्यानंतर इराण अधिक आक्रमक झाला आहे.
Strait of Hormuz : इराण-अमेरिका युद्धात होर्मुझची जगभर चर्चा! पण, ‘होर्मुझ’ नाव कसं पडलं? अर्थ काय?
1. सद्दाम हुसेनच्या पराभवातून घेतला धडा
2003 मध्ये अमेरिकेने इराकच्या सद्दाम हुसेनची सत्ता अवघ्या 26 दिवसांत उलथवून लावली होती. जनरल जाफरी यांनी या युद्धाचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या लक्षात आले की, सद्दामची सेना पूर्णपणे ‘केंद्रीकृत’ म्हणजेच सेंट्रलाईज होती. त्यामुळे बगदाद पडले आणि मुख्य नेतृत्व संपले अन् संपूर्ण लष्करी साखळी विखुरली गेल्याचे जाफरी यांच्या लक्षा आले. इराणमध्ये अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी जाफरी यांनी ‘डिसेंट्रलाइज्ड मोजेक डिफेंस ची संकल्पना मांडली.
2. काय आहे ‘मोजेक डिफेन्स’ सिद्धांत?
RAND नुसार, इराणचा “मोज़ेक सिद्धांत” पहिल्यांदा 2005 मध्ये तयार करण्यात आला होता. त्यावेळी, जाफरी हे IRGC च्या सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजचे संचालक होते. त्यांनी अयातुल्लाहांच्या सत्तेसाठी दोन प्रमुख धोके ओळखले. यात पहिला धोका इराणी स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्त्यांना पाठिंबा देऊन “सॉफ्ट क्रांती” भडकवण्याचा परकीय प्रयत्न आणि दुसरा धोका म्हणजे, अमेरिकेचा लष्करी हल्ला जो राजवट उलथवून टाकू शकतो.
त्यामुळे इराणने 2005 पासूनच या सिद्धांताची अंमलबजावणी सुरू केली आणि 2007 मध्ये जाफरी यांची आयआरजीसी कमांडर-इन-चीफ म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ही प्रक्रिया वेगवान झाली. यूएस इन्स्टिट्यूट ऑफ पीसच्या 2010 च्या अहवालातही याची पुष्टी करण्यात आली आहे.
या अहवालात म्हटले आहे की, 2005 मध्ये, आयआरजीसीने घोषणा केली की, ते ‘मोजेक डिफेन्स’ नावाची लवचिक आणि बहुस्तरीय संरक्षण प्रणाली त्यांच्या रणनीतीमध्ये समाविष्ट करत आहे. या योजनेचे मुख्य शिल्पकार जनरल मोहम्मद जाफरी होते, जे आयआरजीसीच्या सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजचे तत्कालीन संचालक होते, जे नंतरने आयआरजीसी कमांडर बनले.
मोजेक म्हणजे छोट्या छोट्या तुकड्यांपासून बनवलेले एक मोठे चित्र. जाफरी यांनी इराणच्या लष्करी शक्तीचे 31 तुकड्यांमध्ये पुनर्गठन केले. ज्यामध्ये इराणच्या प्रत्येक प्रांताला एक ‘स्वतंत्र लष्करी कमान’ बनवण्यात आले आहे. या प्रत्येक कमानकडे स्वतःचे मुख्यालय, क्षेपणास्त्रे, ड्रोन, ‘बसीज’ मिलिशिया आणि गुप्तचर यंत्रणा आहे.जर तेहरानमधील सुप्रीम लीडर किंवा टॉप कमांडर्स संपले तरी, या 31 तुकड्यांना कोणाच्याही आदेशाची वाट न पाहता पूर्व-नियोजित धोरणानुसार युद्ध सुरू ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
Iran : एक माराल तर, दोन खावे लागतील! इराणचा 3 कलमी ‘मास्टरप्लॅन’; ट्रम्प-नेतान्याहूंची झोप उडाली!
3. 2026 च्या युद्धात सिद्धांताची प्रचिती
‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ मध्ये इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्यासह अनेक दिग्गज जनरल मारले गेले. अमेरिकेला वाटले इराण आता शरण येईल, पण घडले उलटेच. काही तासांतच इराणच्या स्वायत्त तुकड्यांनी ‘ऑटोपायलट’ मोडवर येत बहरीन, कतार, यूएई आणि कुवेतमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला.
4. जनरल जाफरी म्हणजे इराणचे आधुनिक शिल्पकार
मेजर जनरल मोहम्मद अली जाफरी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1979 च्या क्रांतीनंतर केली. इराण-इराक युद्धातील अनुभवातून त्यांनी शिकले की, शक्तिशाली आक्रमकांविरुद्ध टिकून राहण्यासाठी ‘दीर्घकालीन आणि खर्चिक संघर्ष’ हाच एकमेव मार्ग आहे. 2007 मध्ये आयआरजीसीचे प्रमुख झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक प्रांताला लष्करी दृष्ट्या स्वावलंबी बनवले असून, जाफरी यांनी तयार केलेले हे ‘चक्रव्यूह’ सध्या अमेरिका आणि इस्रायलसाठी सर्वात मोठे आव्हान ठरले आहे.
