Ireland Riots : आयर्लंडच्या राजधानीत जाळपोळ! लहान मुलांवरील हल्ल्यानंतर शहरात तणाव

Ireland Riots : आयर्लंडच्या राजधानीत जाळपोळ! लहान मुलांवरील हल्ल्यानंतर शहरात तणाव

Ireland Riots : आयर्लंडची राजधानी डबलिन शहरात (Dublin) एका शाळेबाहेर चाकू हल्ल्याची घटना घडली (Ireland Riots) होती. या हल्ल्यात तीन लहान मुलांसह पाच जण जखमी झाले होते. यानंतर येथील परिस्थिती बिघडली आहे. सगळीकडे जाळपोळ सुरू असून दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तत्काळ बंद करण्यात आल्या आहेत. अत्यंत महत्वाच्या कामाव्यतिरिक्त नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना स्थानिक प्रशासनाने दिल्या आहेत. चाकू हल्ला केल्याच्या प्रकणात पोलिसांनी एका चाळीस वर्षांच्या व्यक्तीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मोठी बातमी ! आयफेल टॉवर बॉम्बने उडवून देण्याची धमकी, सर्च ऑपरेशन सुरू

या घटनेनंतर डबलिन शहरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू झाली आहे. एक डबलडेकर बस पेटविण्यात आली आहे. या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस पथक रस्त्यावर उतरले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या हॉटेल्सच्या काचा फोडल्या आहेत. दुकानात लुटमारीच्या घटनाही घडल्या आहेत. पोलीस व्हॅनदेखील जाळण्यात आली आहे.

या घटनांची माहिती पोलीस आयुक्त ड्र्यू हॅरिस यांनी दिली. ही दृश्ये अत्यंत लाजिरवाणी आहेत. आमच्यातील एक गट उजव्या विचारसरणीने प्रेरित आहे. हा गट हिंसाचारात गुंतला आहे. शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चारशे अधिकारी तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. देशाचे न्यायमंत्री हेलन मॅकेंटी यांनी या घटनांचा निषेध केला असून या घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

चांद्रयानाच्या यशानंतर आणखी एक गुडन्यूज! भारताने आयर्लंडविरुद्धची टी 20 मालिका जिंकली

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube