Israel Hamas War : ‘रणगाडे रुग्णालयात घुसले, गोळीबारही केला’; इस्त्रायलच्या कृत्याने रुग्णांचा श्वास कोंडला
Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील युद्ध अजूनही (Israel Hamas War) सुरुच आहे. आता तर युद्ध जास्तच भडकत चालले आहे. इस्त्रायलने गाझा पट्टीत (Gaza City) जोरदार हल्ले सुरुच ठेवले आहेत. जो पर्यंत हमासचा शेवटचा माणूस संपत नाही तोवर हे युद्ध सुरूच राहणार असल्याची भूमिका इस्त्रायलने घेतली आहे. असे करताना इस्त्रायली सैन्य मात्र कशाचाच विचार करताना दिसत नाही. आता तर गाझातील शिफा रुग्णालयात इस्त्रायलचे रणगाडेच घुसले होते. दवाखान्यातील लोकांना बाहेर पडण्याचे आदेश दिले यासाठी हवेत गोळीबारही केला. इतकेच नाही तर दवाखान्यातच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या त्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. या घुसखोराचा संयुक्त राष्ट्रसंघाने निषेध केला.
Israel Hamas War : पॅलेस्टीनी नागरिकांचाच हमासवर विश्वास नाही; इस्त्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा
इस्त्रायलचे सहा रणगाडे आणि जवळपास शंभरपेक्षा जास्त सैनिक बुधवारी गाझातील शिफा रुग्णालयात घुसले. त्यांनी सर्जिकल आणि आपत्कालीन विभाग वगळता अन्य विभागातील लोकांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यासाठी हवेत गोळीबारही केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे येथील रुग्णांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. परंतु, त्याचा विचार इस्त्रायली सैन्याने केला नाही. शिफा रुग्णालय हमासचे सर्वात मोठे कमांड सेंटर असून ते दहशतवादी कारवाया करत असल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. त्यामुळे हमासचा कायमचा बिमोड करण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे इस्त्रायलने स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे मात्र अमेरिकेसह अनेक राष्ट्रांकडून इस्त्रायलवर दबाव आणला जात आहे. दरम्यान, आतापर्यंत भारताने इस्त्रायलची बाजू घेतली होती. मात्र, संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) इस्रायलने पॅलेस्टिनी भूभागावर कब्जा केल्याचा निषेध करणारा ठराव मांडला होता. त्याला भारताने पाठिंबा दिला आहे. याशिवाय, तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही भारताने केली आहे.
हमास म्हणजे आधुनिक काळातील नाझी, गेल्या 16 वर्षांपासून पॅलेस्टिनींवर अत्याचार
युद्धविरामाचे आरोग्य संघटनेचे आवाहन