खलिस्तान समर्थकांना मोठा झटका, एके-47 चे पोस्टर असलेला कार्यक्रम रद्द
Khalistan Referendum : खलिस्तान समर्थकांना कॅनडा सरकारने मोठा झटका दिला आहे. खलिस्तान समर्थनासाठी आयोजित केलेल्या एका शाळेतील कार्यक्रम कॅनडा अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. 10 सप्टेंबर रोजी कोलंबिया शहरातील एका शाळेत जनमत घेण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. शाळेच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘या कार्यक्रमासाठी केलेल्या कराराचे उल्लंघन केल्यामुळे ते रद्द करण्यात आले’. कार्यक्रमात शस्त्रास्त्रांचे तसेच शाळेचे चित्र होते. कार्यक्रमाच्या पोस्टरवर एके-47 तसेच इतर अनेक प्रकारच्या शस्त्रांचे फोटो होते.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘खलिस्तान जनमत संग्रह’ कार्यक्रमासाठी शाळेचा एक हॉल भाड्याने देण्यात आला होता. खलिस्तान जनमत संग्रहासाठी सरकारी शाळेचा वापर केल्यामुळे नाराज झालेल्या भारतीय-कॅनडियन लोकांनी गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला शाळाकडे तक्रार केली होती.
चांद्रयान-3 मोहिमेच्या काउंटडाउनचा आवाज थांबला, इस्रोच्या शास्त्रज्ञ एन. वलरमथी यांचे निधन
शाळेच्या परिसरात तलविंदर सिंग परमार यांचे पोस्टर चिकटवल्याबद्दल या लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. 23 जून 1985 रोजी एअर इंडिया फ्लाइट 182, कनिष्कवर झालेल्या दहशतवादी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड परमार असल्याचे मानले जाते, ज्यात 329 लोकांचा मृत्यू झाला होता.
सरे शहरातील लोकांनी विरोध केला
इंडो-कॅनेडियन वर्कर्स असोसिएशननेही हा कार्यक्रम रद्द करण्यासाठी स्कूल बोर्डाला पत्र पाठवले होते. शालेय मंडळ, सरे शहर आणि स्थानिक सरकार अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून दिवसाढवळ्या बंदुकीच्या हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहे, सरेच्या रहिवाशांनी एका पत्रात AK-47 बंदुकीच्या फोटोचा हवाला देऊन म्हटले आहे. याआधी ऑस्ट्रेलियानेही असा कार्यक्रम रद्द केला होता. सिडनीच्या ब्लॅकटाऊन शहरात खलिस्तानींचा जनमताचा कार्यक्रम होणार होता.