अमेरिका अन् इस्त्रायलच्या हल्ल्यात सर्वोच्च नेता ठार, इराणकडून नव्या नेत्याची घोषणा
आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणच्या जनतेमध्ये मोठा संताप बघायला मिळतोय.
अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना त्यांच्या कुटुंबासह ठार मारण्यात आलं आहे. या हल्ल्यात आयातुल्ला अली खामेनेई यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य वाचू शकला नाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटलं आहे. इराणकडून इस्त्रायलवरही मोठी हल्ले केली जात आहेत. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणच्या जनतेमध्ये मोठा संताप बघायला मिळतोय. अशा परिस्थितीत आता इराणचे सर्वोच्च नेते म्हणून मोजतबा खामेनी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. इराणची सर्व जबाबदारी आता मोजतबा खामेनी यांच्यावर असणार आहे.
LIVE : अमेरिका इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते ठार, पाहा युद्धात काय घडतय?
आयातुल्ला खामेनी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र मोजतबा इराणचे सर्वेसर्वा
वडिलांच्या मृत्यूनंतर मोजतबा यांनी तात्काळ इराणच्या धार्मिक आणि लष्करी यंत्रणेवर नियंत्रण मिळवले.
त्यांना ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’चा (IRGC) पूर्ण पाठिंबा
मोजतबा हे त्यांच्या वडिलांपेक्षाही अधिक कठोर आणि जहाल विचारांचे मानले जातात.
पदभार स्वीकारताच त्यांच्याकडून इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध “अंतिम युद्धाची” घोषणा.
दुबई आणि इतर आखाती देशांवरील ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमागे मोजतबा यांचेच आदेश असल्याचे मानले जात आहे.
त्यांनी अमेरिकन तळांना लक्ष्य करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
मोजतबा यांच्या नेतृत्वाखाली इराण आपला अण्वस्त्र कार्यक्रम अधिक आक्रमकपणे राबवणार.
