काय सांगता… आता AI बाळाचा जन्म अमेरिकेत होणार, जाणून घ्या एआय बेबी म्हणजे काय?

काय सांगता… आता AI बाळाचा जन्म अमेरिकेत होणार, जाणून घ्या एआय बेबी म्हणजे काय?

Artificial intelligence baby : असं म्हणतात की, आई होणं हा स्त्रीचा दुसरा जन्म असतो. नऊ महिने बाळाला आपल्या गर्भात वाढवणं आणि त्या बाळाला जन्म देणं हे मातृसुख फक्त एक आईचं अनुभवू शकते. मात्र, आता मुले मशीनद्वारे जन्माला घातली जाऊ शकतात, असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र, आता आर्टिफिशियल इंटेलिजेंस बाळ म्हणजेच एआय बेबीज (Artificial intelligence baby) जन्माला येणार आहेत. या तंत्राच्या मदतीने भ्रुणाच्या वाढीदरम्यान अनेक गोष्टींचा अंदाज लावता येतो. जसे- हा गर्भ किती यशस्वी होईल. यामध्ये अनुवांशिक रोगांचे हस्तांतरण होईल की नाही? अमेरिकेत या तंत्राचा वापर करून AI बाळांचा जन्म होऊ शकतो. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, AI Baby म्हणजे काय? या तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाईल ? जगात कुठे कुठे या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे? याच विषयी जाणून घेऊ. (Now AI baby will be born in America what is AI baby)

एआय बेबी म्हणजे काय?

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, हे तंत्रज्ञान आयव्हीएफ प्रक्रियेत वापरले जाईल. IVF हा एक प्रकारचा प्रजननाचा उपचार आहे. ज्यांना मुले होऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. थोडक्यात काय तर या प्रक्रियेद्वारे वंध्यत्वावर उपचार केले जातात. आयव्हीएफ प्रक्रियेदरम्यान, गर्भ विकसित केला जातो आणि स्त्रीच्या गर्भाशयात प्रत्यारोपण केले जाते.
आता या भ्रूणाची तपासणी अशा आर्टिफिशियल इंटेलिजेंसने सुसज्ज सॉफ्टवेअरद्वारे केली जाणार आहे, ज्यामुळे याविषयी अन्य माहिती मिळेल. या भ्रूणातून जन्मलेल्या मुलांनाच एआय बेबी म्हटले जात आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजेंस किती प्रभावी आहे?

अहवालानुसार, IVF प्रक्रियेदरम्यान, आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे त्याच्या यशाचा दर वाढविला जात आहे. असा दावा करण्यात आला आहे की AI अल्गोरिदम वापरून, IVF चा यशाचा दर 30% पर्यंत वाढवता येतो. गर्भधारणेच्या बाबतीत, सध्या हे तंत्र युरोप, आशिया, दक्षिण अमेरिकेत वापरले जात आहे.

आझम खान यांना वादग्रस्त वक्तव्य भोवले, रामपूर कोर्टाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा 

नवीन पद्धत दिलासा देणारी आहे का?
असा प्रश्न तुम्हाला पडला असले तर त्याविषयी समजून घेऊ. वास्तविक, गर्भाचा विकास आयव्हीएफ प्रक्रियेदरम्यान होतो. यानंतर, भ्रूण यशस्वीरित्या विकसित झाला आहे की नाही हे तपासले जाते. त्यानंतरच भ्रूण स्त्रीच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केले जाते.

तपासाची ही प्रक्रिया खूप खर्चिक आहे. जगातील अनेक देशांमध्ये एका सेशनसाठी सुमारे 10 लाख रुपये घेतले जातात. यानंतरही नवीन भ्रूण यशस्वी होईलच याची शाश्वती नाही. अहवालानुसार, जगभरातील आयव्हीएफ प्रकरणांमध्ये यशाचे प्रमाण केवळ 24 टक्के आहे.

तज्ञ काय म्हणतात?

AI च्या माध्यमातून भ्रूणांचे परीक्षण करणार्‍या AIVF या कंपनीच्या सीईओ एम्ब्रायोलॉजिस्ट डॉ. डॅनिएला गिलबोआ म्हणतात, भ्रूण निवड ही आयव्हीएफ प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची पायरी आहे. आतापर्यंत मानवी डॉक्टर हे काम करत होते, पण आता त्याची गुणवत्ता एआयच्या माध्यमातून तपासली जाऊ शकते.

सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास, सर्व भ्रूण दिसायला सारखे दिसतात, अशा परिस्थितीत कोणता भ्रूण चांगला सिद्ध होईल हे ठरवणे कठीण होते. अशा परिस्थितीत आर्टिफिशियल इंटेलिजेंस तज्ञांना मदत करेल. एका चाचणीदरम्यान असं सिध्द झालं की, एआय बाळाला इतर मुलांच्या तुलनेत जनुकीय आजारांचा धोका कमी असू शकतो.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube