आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची कोरोना चाचणी होणार

आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची कोरोना चाचणी होणार

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता भारतात खबरदारी घेण्यात येत आहे. सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आता आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून प्रवाशांची कोरोना चाचणी आणि थर्मल स्क्रीनिंग होणार आहे. आजपासून हा नियम लागू करण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात संगण्यात आले आहे की, इंटरनॅशनल विमानाने येणाऱ्या प्रवाशांपैकी 2 टक्के प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कोणत्या प्रवाशांची कोरोना चाचणी करायची हे विमान कंपनी ठरवेल. वेगवेगळ्या देशांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचाही चाचणीत समावेश केला जाईल. मार्गदर्शक सूचनांनुसार या प्रवाशांचे नमुने घेऊन त्यांना जाण्याची परवानगी दिली जाईल. कोरोना चाचणीनंतर एखाद्या प्रवाशाला कोविडची लागण झाल्याचे आढळल्यास त्याचा नमुना जीनोमिक चाचणीसाठी पाठवावा, असे या पत्रात म्हटले आहे.

सरकारकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना :

1. इंटरनॅशनल प्रवाशांपैकी 2 टक्के लोकांची कोरोना टेस्ट होणार.
2. कोणत्या प्रवाशांची चाचणी करायची ते संबंधित एअरलाइन्स ठरवणार आहे. त्यांचे सॅंपल घेतल्यानंतर त्यांना एअरपोर्टहून बाहेर जाऊ दिले जाणार आहे.
3. चाचणी दरम्यान प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास, त्याचा नमुना जीनोम चाचणीसाठी पाठविला जाईल.
4. कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांना प्रोटोकॉलनुसार वेगळे केले जाईल.
5. 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना या चाचणीतून सूट देण्यात आली आहे.
6. सर्व प्रवाशांना स्वतःची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
7. कोरोनाची लक्षणे आढळल्यास राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 1075 वर कळवण्यास सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube