Pervez Musharraf passes away : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 02 05 At 12.23.56 PM

दुबई: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचं निधन झालं आहे. दुबईतील (Dubai) रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानच्या (Pakistan) माध्यमांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुशर्रफ गंभीर आजाराने ग्रस्त होते. 10 जून 2022पासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

परवेझ मुशर्रफ यांनीच 1999 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना न सांगता भारताविरुद्ध कारगिल (Kargil War)  युद्ध सुरू केले होते. तसेच लष्करप्रमुख असताना त्यांनी सत्तापालट करून पाकिस्तानात मार्शल लॉ (Marshal Law) जाहीर केला होता.

परवेझ मुशर्रफ यांचा जन्म नवी दिल्लीतील (New Delhi) दर्यागंज येथे झाला होता. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर 1947 मध्ये मुशर्रफ कुटुंबाने पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. फाळणीच्या काही दिवस आधी मुशर्रफ कुटुंब पाकिस्तानात पोहोचले होते. त्याचे वडील सईद पाकिस्तानच्या नव्या सरकारसाठी काम करू लागले आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित होते.

 

Tags

follow us