पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावाच्या कारचा भीषण अपघात, नातवाचा पाय फ्रॅक्चर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावाच्या कारचा भीषण अपघात, नातवाचा पाय फ्रॅक्चर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदींच्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली. कर्नाटकमधील म्हैसूरजवळील कडकोलामध्ये हा अपघात घडला आहे. अपघातात प्रल्हाद मोदींसोबत त्यांचे कुटुंबिय होते. या अपघातात सर्वजण जखमी झाले आहेत.

पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी आपल्या कुटुंबियांसमवेत कारमध्ये बांदीपुरा इथं जात होते. त्याचवेळी त्यांची कार दुभाजकावर आदळून अपघात घडला. यावेळी त्यांचा ताफा देखील सोबत होता.

या अपघातात प्रल्हाद मोदी यांच्या नातवाचा पाय फ्रॅक्चर झाला असून इतरांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात घडल्यानंतर त्यांना म्हैसूरच्या जेएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, अपघातानंतर समोर आलेल्या छायाचित्रात कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत असून अपघाताची माहिती मिळताच म्हैसूरच्या पोलीस अधीक्षक सीमा लाटकर तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. यानंतर त्यांनी रुग्णालयालाही भेट दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube