मालदीववर मध्यरात्री ‘सायबर अॅटॅक’ : PM मोदींवरील खालच्या भाषेतील टीका भोवल्याची चर्चा
नवी दिल्ली : मालदीवमधील राष्ट्रपती कार्यालयासह अनेक सरकारी वेबसाइट्स शनिवारी रात्री उशिरा डाऊन झाल्या. स्थानिक वृत्तानुसार, यामागे सायबर हल्ल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती कार्यालयाची वेबसाईट सुरु झाली असली तरीही अद्याप परराष्ट्र मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालयाच्या वेबसाईट अजूनही डाऊन असल्याचे सांगण्यात येत आहे. या वेबसाईट्स ओपन करताना एरर मेसेज येत आहे. (Several government websites including the President’s Office in Maldives were down late Saturday night.)
PM मोदींवरील खालच्या भाषेतील टीकेनंतर सायबर हल्ला झाल्याची चर्चा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षद्वीपचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी त्यांचे फोटोही शेअर केले. पण त्यांच्या या दौऱ्यावर मालदीवकडून अत्यंत खालच्या भाषेत टीका करण्यात आली. मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शिउना यांनी नरेंद्र मोदींसाठी ‘जोकर’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ असे शब्द वापरले. त्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Bangladesh Train : मतदानाआधीच हिंसा! बांग्लादेशात रेल्वेला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू
याचनंतर मालदीवर अवघ्या काही तासात सायबर अॅटॅक झाल्याने या दोन्ही घटनांचा संबंध जोडला जात आहे. मात्र हा सायबर हल्ला कुठून झाला आणि कोणी केला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मालदीवच्या एनसीआयटी आणि इतर एजन्सी याबाबतचा तपास करत असून परराष्ट्र मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालयाच्या वेबसाईट्स सुरु करण्याचे काम सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
PM मोदींच्या दौऱ्यावरुन काँग्रेसचीही टीका :
पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यावर काँग्रेसनेही चांगलाच हल्लाबोल केला. ‘बस मणिपूर नही जायेंगे’ असे म्हणत मोदींच्या फोटोंवर काँग्रेसने लिहिलं की, आठ महिन्यांपासून मणिपूर जळत आहे. अजून देखील लोकांच्या हत्या होत आहेत. भारतीय नागरिक मारले जात आहेत. लोक बेघर आहेत. अनेक महिलांची प्रतारणा होत आहे. मात्र भारताचे पंतप्रधान कुठे आहेत? तुम्हीच पहा. भारताचे पंतप्रधान मज्जा करत आहेत. समुद्रकिनारी चांगलीच फोटोबाजी सुरू आहे, अशीही टीका केली.
US Shooting : धक्कादायक! अमेरिकेतील शाळेत गोळीबार; एक विद्यार्थी ठार, 5 जण जखमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लक्षद्वीप दौरा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (4 जानेवारीला) केंद्रशासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीपच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची संवाद साधला. तसेच या दौऱ्याची खास गोष्ट म्हणजे यावेळी लक्षद्वीपच्या समुद्रकिनाऱ्यावर पंतप्रधान मोदींनी स्नॉर्कलिंगचा आनंद लुटला. या समुद्रकिनाऱ्यावरच्या सफरीचे आणि एडवेंचरचे नयनरम्य फोटो त्यांनी त्यांच्या एक्स या सोशल मिडीया हँडलवर शेअर केले.