Shivaji Maharaj Statue Stolen : अमेरिकेतील शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला!

Shivaji Maharaj Statue Stolen : अमेरिकेतील शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला!

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील (America) कॅलिफोर्निया (California’) या राज्यातील सॅन होजे (San Jose) शहरातील एका उद्यानात असलेला छत्रपती शिवाजी महाराज (Shri Shivaji Maharaj Statue Stolen) यांचा पुतळा चोरीस गेला आहे. ‘सिस्टर सिटी’ मोहिमेंतर्गत सॅन होजे आणि पुण्याचे संबंध प्रस्थापित करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे शहराने हा पुतळा सॅन होजेला भेट दिला होता. अमेरिकेतील शिवाजी महाराज्यांच्या एकमेव पुतळा होता. त्याची चोरी झाली असून पोलिस तपास करत आहेत.

‘पार्क, रिक्रिएशन आणि नेबरहूड सव्‍‌र्हिसेस’ने ‘ट्विटर’द्वारे ही माहिती दिली. मात्र, या पुतळय़ाची चोरी नेमकी कधी झाली, याबद्दल अद्याप अधिक माहिती मिळाली नाही. पुतळा चोरीस गेल्याचे शहरवासीयांना खूप दु:ख झाले आहे.

संपूर्ण उत्तर अमेरिकेत शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा आहे. विभागाने केलाल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘ग्वाडालुपे रिव्हर पार्क (Guadalupe River Park) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होता. पुतळा कधी चोरीला गेला हे अद्याप माहिती मिळालेली नाही. पुतळा चोरीला गेल्यानंतर शोधमोहीम सुरु असून आम्ही समुदायाच्या नेत्यांसोबत काम करत आहे. याबद्दल जी माहिती मिळेल तशी आम्ही सतत अपडेट देऊ. यासाठी लोकांची मदत घेत आहे.

शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळ्याचे पुण्याशी कनेक्शन होते. उत्तर अमेरिकेतील सॅन होजे हा शहराला हा पुतळा पुणे शहराकडून भेट म्हणून देण्यात आला होता. कॅलिफोर्नियातील सॅन होजे हे शहर पुण्याचे (Pune) ‘सिस्टर शहर’ (Sister City) म्हणून ओळखले जात आहे. दोन्ही शहरांचा इतिहास समृद्ध आहे. दोन्हीही संबंधित देशांतील शिक्षणाची केंद्रे आहेत. या उपक्रमाअंतर्गत सॅम जोस शहराला हा पुतळा भेट म्हणून दिला होता. सॅन होजे शहर हे पुण्याप्रमाणेच उच्च तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट विद्यापीठांसाठी देशभरात ओळखले जाते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube