सावधान..! पृथ्वीवर धडकणार सौर वादळ; जगभरात मोठ्या नुकसानीची भीती
Solar Storm : हवामानातील बदलांचा मोठा फटका पृथ्वीवरील जनजीवनाला बसू लागला आहे. अवकाशात होणाऱ्या (Solar Storm) घटनांचा परिणाम पृ्थ्वीवर जाणवतो. आताही एक काळजीत टाकणारी बातमी आली आहे. अवकाशातील वातावरणात लक्षणीय उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. अंतराळ हवामान अंदाज सांगतात की एक शक्तिशाली सौर वादळ पृथ्वीवर धडकेल. मागील १९ वर्षांत ही पहिलीच वेळ असेल जेव्हा जगभरातील ब्लॅक आऊट, नेव्हिगेशन प्रणालीत अडथळा आणि हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ वेबच्या प्रभावासह मोठ्या उलथापाथीची परिस्थिती असेल.
NOAA has confirmed an "extreme" G5 geomagnetic storm, making this the biggest solar storm in 21 years. Here are the potential impacts. pic.twitter.com/NXR5IC8wbF
— BNO News (@BNONews) May 11, 2024
या आठवड्याच्या शेवटी सौर वादळ पृथ्वीवर धडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अमेरिकन स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने या वादळासंदर्भात जी 4 जिओमॅग्नेटिक स्टॉर्म वॉच जारी केले आहे. अहवालात दावा करण्यात आला आहे की २००५ नंतरचे हे पहिलेच सौर वादळ असेल ज्यामुळे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
Chandrayaan 3 : चंद्रावरील फोटो चांद्रयान-3 ने मिशन कंट्रोलला पाठवले; इस्त्रोने केले शेअर
सौर वादळे का येतात?
कोरोनल मास इजेक्शन किंवा सीएमई, सूर्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्या स्फोटक घटना आहेत. ज्यामध्ये त्यापासून प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्र सोडणे समाविष्ट आहे. जेव्हा सीएमई पृथ्वीच्या दिशेने सोडले जातात तेव्हा ते भूचुंबकीय वादळे निर्माण करू शकतात. अशा वादळांमध्ये पृथ्वीच्या कक्षेत आणि ग्रहाच्या पृष्ठभागावरील विविध प्रणालींवर परिणाम होण्याची शक्यता असते. सौर वादळे दळणवळण, इलेक्ट्रिकल पॉवर ग्रिड, नेव्हिगेशन, रेडिओ आणि सॅटेलाइट ऑपरेशन्समध्ये अडथळे आणतात.
सौर वादळ म्हणजे काय ?
सौर वादळ हे सूर्यावरील चुंबकीय क्षेत्रातील अनियमिततेमुळे तयार होणारे वादळ आहे. सूर्यावर दिसणारे डाग कालांतराने मोठे होत जातात. सूर्याचं चुंबकीय क्षेत्र ज्यावेळी जास्त बलवान असतं तेव्हा या सौर डागांची संख्या वाढते. मोठ्या झालेल्या डागाच्या ठिकाणी विस्फोट होऊन सौरवादळांची निर्मिती होते. कधीकधी या स्फोटातून तयार झालेलं वादळ सूर्याचं चुंबकीय क्षेत्र पार करून सोलर सिस्टममध्ये सगळीकडे पसरतं. साधारणपणे ११ वर्षांनंतर सौर डागांची संख्या जास्तीत जास्त होते. अशा वेळी सौर वादळे येण्याची शक्यता राहते.
सूर्याचा पृ्ष्ठभाग जो पृथ्वीचा दिशेला असतो त्याव झालेले स्फोट दिसून येतात किंवा ते अनुभवले जाऊ शकतात. या स्फोटांचा पृथ्वीवर परिणाम होईलच असे मात्र नाही. कारण हे स्फोट अंतराळातच विरून जातात पण, आताच वादळ पृ्थ्वीवर धडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असं जर घडलं तर पृथ्वीवर मोठं नुकसान होऊ शकतं असे सांगितले जात आहे.