Aditya-L1 Solar Mission : चांद्रयान-3 प्रमाणेच आदित्य L-1 मध्येही विक्रम अन् प्रज्ञान असणार का?

  • Written By: Published:
Aditya-L1 Solar Mission : चांद्रयान-3 प्रमाणेच आदित्य L-1 मध्येही विक्रम अन् प्रज्ञान असणार का?

Aditya-L1 Solar Mission : चंद्राच्या दक्षिण धुव्रावर यशस्वीपणे चांद्रयान 3  (Chandryan 3) उतरवल्यानंतर आज भारताने आणखी एक इतिहास रचण्याकडे वाटचाल करण्यास सुरूवात केली आहे. इस्त्रोकडून सूर्ययान म्हणजेच आदित्य L1 (Aditya L1) सूर्याच्या दिशेने पाठवण्यात आले आहे. ही भारतासाठी अतिशय गर्वाची बाब आहे. मात्र,  या लाँचिंगमध्ये चांद्रायान 3 प्रमाणे आदित्य L1 मध्येही विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर असणार का? यासह अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात उपस्थित झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण थोडक्यात जाणून घेऊया.

Aditya L1 Budget : सूर्यमोहिमेचं बजेट किती? आकडे पाहून वाटेल अभिमान

आतापर्यंत, भारतीय शास्त्रज्ञ सूर्याचा अभ्यास करण्यासाठी जमिनीवर आधारित दुर्बिणी वापरत असत किंवा नासा आणि युरोपियन अवकाश संस्थांच्या मोहिमांमधून मिळालेल्या डेटावर अवलंबून असत.

आदित्य-L1 हे PSLV-C57 रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाईल. 44.4 मीटर लांबीच्या या रॉकेटची उचलण्याची क्षमता 421 टन आहे. याचे वजन 1480.7 किलो असून, यात सात पेलोड आहेत. त्यापैकी चार थेट सूर्याचे निरीक्षण करतील, तर इतर तीन सिटूमध्ये L1 बिंदूमध्ये आणि आसपासच्या कण आणि चुंबकीय क्षेत्रांचा अभ्यास करणार आहेत.

मिशनचं उद्दिष्टे काय ?
इस्त्रोचे आदित्य L1  हे मिशन सौर कोरोनाची रचना (सूर्यच्या वातावरणाचा सर्वात बाहेरील भाग) आणि त्याची उष्णता प्रक्रिया, त्याचे तापमान, सौर उद्रेक आणि सौर वादळांची कारणे आणि उत्पत्ती, कोरोनल लूप प्लाझमाची रचना आदींसह वेग आणि घनता, सौर वारे आणि अंतराळ हवामानावर परिणाम करणारे घटक या गोष्टींचा अभ्यास या मिशनद्वारे केले जाणार आहे.

India Alliance Logo : सहभागी झालेल्या नव्या पक्षांनी केला खेळ; ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोला ‘खो’

आदित्य L1 मध्ये लँडर आणि रोव्हर असणार का?

आदित्य L1 मध्ये लँडर आणि रोव्हर नाहीये. जेव्हा दुसऱ्या ग्रहावर किंवा उपग्रहावर यान उतरवायचे असते त्यावेळी त्यात लँडर आणि रोव्हर हे अवकाशयानात पाठवले जातात. आदित्य-L1 सूर्यावर जात नाहीये, तर ते सूर्याच्या जवळ पाठवले जात आहे.

आदित्य L1 हे सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लॅग्रॅन्गियन बिंदूभोवती कक्षेत उतरवले जाणार आहे. या बिंदूवर सूर्य आणि पृथ्वी एकमेकांच्या गुरुत्वाकर्षण तटस्थ करतात.यामुळे या ठिकाणी कोणतीही वस्तू पाठवली तर, ती पुन्हा पृथ्वीच्या दिशेने खाली कोसळणार नाही किंवा सूर्यकडे जाणार नाही. त्यामुळे आदित्य L1 उतरवण्यासाठी या बिंदूची निवडकरण्यात आली आहे. या बिंदूला पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील पार्किंग पॉइंट देखील असेदेखील म्हटले जाते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube