Aditya L1 Budget : सूर्यमोहिमेचं बजेट किती? आकडे पाहून वाटेल अभिमान

Aditya L1 Budget : सूर्यमोहिमेचं बजेट किती? आकडे पाहून वाटेल अभिमान

Aditya L1 Budget : चंद्राची मोहिम यशस्वी पार पाडल्यानंतर भारताने सूर्याच्या दिशेने जाण्याची तयारी केली आहे. थोड्याच वेळात इस्त्रोचे आदित्य एल1 (Aditya L1 Budget) यान सूर्याकडे झेप घेणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सूर्याची अनेक रहस्ये आपल्यासमोर येतील. या मोहिमेसाठी मोठा खर्च तर झाला आहेच पण जगातील अन्य देशांच्या तुलनेत हा खर्च कमीच आहे. याआधी भारताने चंद्र मोहिम यशस्वी केली होती. त्याचा खर्च एक हॉलीवूड चित्रपटाच्या बजेटपेक्षाही कमी होता.

सूर्य मोहिमेसाठी किती खर्च (Aditya L1 Budget) आला याची माहिती इस्त्रोने (ISRO) अद्याप दिलेली नाही. पण सरकारने लोकसभेत सांगितले होते की सोलर मिशनसाठी 378.53 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये लाँचिंगसाठी येणारा खर्च समाविष्ट केलेला नाही. या बजेटसह हे आतापर्यंतचे सर्वात स्वस्त मिशन असेल. नासाचे (NASA) स्टीरियो (Stereo) स्पेसक्राफ्ट ऑक्टोबर 2006 मध्ये लाँच करण्यात आले होते. या मोहिमेचे बजेट 55 कोटी डॉलर म्हणजेच 4 हजार 549 कोटी रुपये इतके जास्त होते.

Aditya L1 Mission : चंद्रानंतर सूर्याकडे झेप! आदित्य L1 चं आज होणार प्रक्षेपण

नासाच्या पार्कर सोलर प्रोब (parker Solar Probe) मोहिमेचा खर्च 1.5 अब्ज डॉलर म्हणजेच 12 हजार 408 कोटी रुपये आहे. पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या सर्वाधिक जवळ जाणारे मिशन आहे. या मोहिमांच्या तुलनेत भारताच्या आदित्य एल1 यान (Aditya L1 Budget) आणि मोहिमेचा खर्च काहीच नाही असेच म्हणावे लागेल.

तिनही चंद्र मोहिमांचा खर्च फक्त 1978 कोटी

इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान 3 तयार करण्यासाठी एकूण 615 कोटी रुपये खर्च झाला होता. विक्रम लँडर, रोव्हर प्रज्ञान आणि प्रोपल्शन मॉड्यूल तयार करण्याचा खर्च 250 कोटी रुपये आहे. तसेच या यानाच्या लाँचिंगवर 365 कोटी रुपये खर्च झाले. या मोहिमेचा खर्च आधीच्या चांद्रयान 2 मोहिमेच्या 30 टक्के कमी आहे. सन 2008 मध्ये पाठवलेल्या चांद्रयान 1 मोहिमेचा एकूण खर्च 386 कोटी रुपये इतका होता. सन 2019 मध्ये पाठवण्यात आलेल्या चांद्रयान 2 वर एकूण 978 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. म्हणजेच तीनही चंद्र मोहिमांवर इस्त्रोने एकूण 1 हजार 978 कोटी रुपये खर्च केले. या खर्चाचा विचार केला तर त्या तुलनेत अमेरिका आणि अन्य देशांच्या मोहिम अनेक पटींनी जास्त खर्चिक आहेत.

Super Blue Moon तुम्ही पाहिलात का? चंद्राच्या मोहक दृश्यांनी वेधले लक्ष

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube