Strike : इटलीत संप, विमानतळावर अडकले हजारो भारतीय

Strike : इटलीत संप, विमानतळावर अडकले हजारो भारतीय

Italy : उन्हाळ्याच्या सुट्टीत युरोप (Europe) फिरायला गेलेले हजारो लोक सध्या इटलीतील (Italy) विविध विमानतळांवर अडकून पडले आहेत. इटलीतील विमानतळावर काम करणारे कर्मचारी आणि पायलट संपावर गेले आहेत. या संपामुळे इटलीच्या विविध विमानतळांवरून दिल्लीला (Delhi) येणारी उड्डाणे तसेच फ्रँकफर्टमार्गे दिल्लीला येणारी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्याचा मोठा फटका भारतीय प्रवाशांसह जगभरातील प्रवाशांना बसत आहे. (Thousands of Indian passengers from Italy to Frankfurt were stranded at the airport)

काही दिवसांपूर्वी इटलीतील विविध वाहतूक विभागांचा संप सुरू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, इटलीतील रेल्वे संपानंतर एअरलाइन्स कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला. या संपामुळे युरोपातून जगाच्या विविध भागात जाणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. पायलट आणि कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. इटलीतील या संपामुळे संपूर्ण युरोपातील उड्डाणांवर मोठा परिणाम झाला आहे. या संपामुळं विमान उड्डाणे रद्द करण्याात आली.

‘आता काँग्रेसचा नंबर, त्यांचे घरही लवकरच फुटणार’; शिंदे गटाच्या आमदाराने उडवली खळबळ 

परिणामी, दिल्लीसह देशातील विविध शहरात येणाऱ्या नागरिकांना विमानतळावरच उघड्यावर रात्र काढावी लागत आहे. एवढेच नाही तर विमानसेवा रद्द झाल्यामुळे किंवा उशीर सुटणार असल्यामुळं विमान कंपन्यांकडून नुकसान भरपाईऐवजी कुणाला पाण्याची बाटली तर तर कुणाला केवळ दीड हजार रुपये (15 युरो) परत करून एअरलाईन्सकडून समजूत काढली जात आहे.

पुढील फ्लाइट कधी मिळेल हे जाणून घेण्यासाठी शेकडो भारतीय विमानतळावर विचारपूस करत आहेत. व्हेनिस विमानतळावर अडकलेल्या एका प्रवाशाने सांगितले की, केवळ या विमानतळावरच नाही तर इटलीतील सर्व विमानतळांवर हीच परिस्थिती आहे. रोममध्येही अशीच परिस्थिती आहे. उड्डाणे कधी सुरू होणार, असं प्रवाशांनी विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपन्यांला विचारणा केली. मात्र सध्या त्यांना कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांनी त्यांच्या रात्रीच्या मुक्कामासाठी हॉटेल्सची व्यवस्था करण्याबाबत एअरलाइन्सशीही चर्चा केली. पण एअरलाइन्सने त्यांना विमानतळावरही मदत केली नाही,त्यामुळं फ्रँकफर्ट विमानतळावर थंडीच्या वातावरणात उघड्यावर प्रवाशांना रात्र काढावी लागली.

फ्रँकफर्ट विमानतळापासून इटलीपर्यंत वेगवेगळ्या विमानतळांवर अडकलेल्या लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना उड्डाण विलंब आणि रद्द झाल्याच्या भरपाईच्या नावाखाली काहीही दिले गेले नाही. एका प्रवाशाचे म्हणणे आहे की एअरलाइन्सने त्यांना नुकसान भरपाईच्या नावाखाली फक्त 15 युरो परत केले. तर काही लोकांना विमान कंपन्यांनी पाण्याची बाटली देऊन नुकसान भरपाई म्हणून दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube