ट्रम्प यांच्याकडून होर्मुज पुन्हा बंद! जहाजांवर लावणार 20 टक्के टॅक्स; इराणसोडून ‘या’ देशांना सूट
Trump Anaounces tax Strait of Hormuz अमेरिका-इराणमध्ये हल्ले-प्रतिहल्ले वाढले आहेत. आता ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ हार्मोस पुन्हा एकदा बंद केला.
Trump Anaounces 20% tax to imposed on ships passing through Strait of Hormuz exemption other than Iran : गेल्या साडेचार महिन्यांपासून इराण-अमेरिका या देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष अद्याप देखील थांबलेला नाही. शस्त्रसंधी संपल्यानंतर आता पुन्हा एकदा अमेरिका-इराणमध्ये हल्ले-प्रतिहल्ले वाढले आहेत. याच दरम्यान आता डोनाल्ड ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ हार्मोस पुन्हा एकदा बंद केला आहे.
नेमकं काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली आहे आणि इराण असो वा नसो, ती खुलीच राहील. आम्ही ‘इराणी नाकेबंदी’ पुन्हा लागू करत आहोत. या नाकेबंदीचे हे नाव यासाठी आहे की, ती केवळ इराणची जहाजे किंवा इराणशी संबंधित ग्राहकांनाच हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवेश किंवा बाहेर पडण्यापासून रोखेल. इतर सर्व देशांना या सामुद्रधुनीचा मुक्त आणि समान वापर करता येईल.
यापुढे अमेरिका ‘हॉर्मुझ सामुद्रधुनीची संरक्षक’ (The Guardian of the Hormuz Strait) म्हणून ओळखली जाईल. मात्र, ही सुरक्षा आणि संरक्षणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी होणाऱ्या सर्व खर्चाच्या मोबदल्यात, न्याय्यतेच्या तत्त्वावर, या सामुद्रधुनीतून होणाऱ्या प्रत्येक मालवाहतुकीवर 20 टक्के शुल्क आकारले जाईल. या निर्णयाची अंमलबजावणी आणि आवश्यक यंत्रणा तात्काळ सुरू करण्यात येईल.
अमेरिकेच्या बंदीनंतर इराण आक्रमक!
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या काही मिनिटांतच इराणनेही मोठा निर्णय जाहीर केला. इराणच्या ‘पर्शियन गल्फ स्ट्रेट अथॉरिटी’ (PGSA) या संस्थेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करत हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यात आल्याची घोषणा केली.
Amarnath Yatra 2026: अमरनाथमधील शिवलिंग पाच दिवसांत वितळले; नेमकं कारण काय ?
इराणच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन लष्कराकडून सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे या सामुद्रधुनीतून जहाजांची सुरक्षित वाहतूक करणे सध्या शक्य नाही. परिस्थिती सामान्य आणि शांत झाल्यानंतरच ही सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. याशिवाय, आतापासून हॉर्मुझ सामुद्रधुनीतून मार्गक्रमण करणाऱ्या प्रत्येक जहाजाला इराणच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन परवानगी घेणे बंधनकारक असेल, असेही इराणने स्पष्ट केले.