Pakistan : पाकिस्तानात ‘चीनी’ टार्गेट! ग्वादर परिसरात चीनी अभियंत्यांवर हल्ला; अंदाधुंद गोळीबार

Pakistan : पाकिस्तानात ‘चीनी’ टार्गेट! ग्वादर परिसरात चीनी अभियंत्यांवर हल्ला; अंदाधुंद गोळीबार

Pakistan News : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानातून आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. बलुचिस्तान प्रांतात चीनी अभियंत्यांच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. शस्त्रसज्ज दहशतवाद्यांना हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी सकाळी ग्वादर परिसरात ही थरारक घटना घडली.

या भागात पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी) प्रकल्पातील अनेक काम सुरू आहेत. स्थानिक रिपोर्टसनुसार येथे मागील दोन ते अडीच तासांपासून गोळीबार सुरू आहे. या घटनेत किती जखमी झाले आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या हल्ल्यात काही चीनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मोठी बातमी ! आयफेल टॉवर बॉम्बने उडवून देण्याची धमकी, सर्च ऑपरेशन सुरू

या हल्ल्याची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मीच्या एक आत्मघाती पथकाने घेतली आहे. बीएलएचा दावा आहे की या हल्ल्यात त्यांनी चीनी नागरिक आणि पाकिस्तानी सेनेतील 9 जवानांसह 13 जणांना ठार केले आहे. या भागात अजूनही गोळीबार सुरू आहे. रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. चीनी अभियंत्यांच्या पथकावर सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. हल्ल्यानंतर पाकिस्तानातील चीनी वाणिज्य दूतावासांनी बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातील आपल्या नागरिकांना घरातच राहण्यास सांगितले आहे.

सीपीईसी प्रकल्पात चीनने अब्जावधींची गुंतवणूक केली आहे. चीनने पाकिस्तानी सैन्याशी चर्चाही केली होती. चीनी नागरिकांवर पाकिस्तानात होणारे हल्ले आणि बलुचिस्तानात होणारे हल्ले थांबवले गेले नाहीत तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत असा इशाराही चीनने दिला होता. मात्र तरीही या परिस्थितीत काही फरक पडल्याचे दिसत नाही. चीनी नागरिकांवर पाकिस्तानात हल्ले सुरुच आहेत. याआधीही चीनी नागरिक आणि सीपीईसी प्रकल्पात काम करणाऱ्या चीनी अभियंत्यांवर हल्ले झालेले आहेत. या प्रकल्पाला बलुचिस्तानातील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे या हल्ल्यांतही वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Pakistan PM: अन्वर उल हक कक्कर पाकिस्तानचे 8 वे काळजीवाहू पंतप्रधान

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube