ब्रेकिंग : भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या चीनला दणका; मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’चे अकाऊंट ब्लॉक

‘X’ account of Chinese propaganda media outlet ‘Global Times’ withheld in India : पाकिस्ताननंतर आता भारताने चीनविरुद्ध कारवाई केली आहे. ड्रॅगनचे मुखपत्र ग्लोबल टाईम्स (Global Times) भारताने ब्लॉक केले आहे. सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील त्याचे अकाउंट ब्लॉक केले आहे. ग्लोबल टाईम्स भारताविरुद्ध बनावट बातम्या चालवत होते, त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
The 'X' account of Chinese propaganda media outlet 'Global Times' withheld in India. pic.twitter.com/B9Q941FTjX
— ANI (@ANI) May 14, 2025
ग्लोबल टाईम्स हे चीनचे मुखपत्र आहे, जे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अजेंड्याला पुढे नेण्याचे काम करते. एवढेच नव्हे तर, या मुखपत्रातून भारताविरुद्ध खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या. ग्लोबल टाईम्सवर कारवाई करण्यापूर्वी भारताने अरुणाचल प्रदेशबाबत आफली भूमिका स्पष्ट केली. ज्यात अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनचे प्रयत्न हास्यास्पद असून, हे राज्य भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील हे निर्विवाद सत्य बदलणार नसल्यााचे छातीठोकपणे सांगितले.
ब्रेकिंग : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर टरकलेल्या पाकिस्तानने BSF जवानाला 20 दिवसांनी सुखरूप सोडलं
चीनपूर्वी पाकिस्तानवर कारवाई
चीनच्या आधी भारताने पाकिस्तानविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित केला. याशिवाय पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्लाबोल करत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारताचे रौद्ररूप पाहून पाकिस्तानने अमेरिकेच्या मध्यस्थीने भारताकडे युद्धबंदी करण्याची याचना केली. त्यानंतर डीजीएमओ स्तरावरील चर्चेनंतर दोन्ही देशांनी शांततेसाठी सहमती दर्शविली.
Video : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानला पुणेकरांचा दणका; 1500 कोटींची डिल कॅन्सल
पंतप्रधान मोदींच्या अरुणाचल दौऱ्यावर चीनकडून निषेध
पंतप्रधान मोदींच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याला चीनने तीव्र विरोध केला होता, त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक निवेदन जारी करत भारतीय नेते आणि पंतप्रधान वेळोवेळी अरुणाचल प्रदेशला त्याच पद्धतीने भेट देतात ज्या पद्धतीने ते भारतातील इतर राज्यांना भेट देतात असे म्हणत पंतप्रधानांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याबाबत चीनचे विधान नाकारत खडेबोल सुनावले होते.