मनोज जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य, एका मागणीचं काय झालं? फडणवीसांनी सांगितलं

13 पैकी 12 मागण्या मान्य करण्यात आल्या असून, एका मागणीमध्ये कायदेशीर अडचण असल्याने ती मान्य करता आली नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 17T130658.158

12 out of Manoj Jarange’s 13 demands accepted : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. सरकारने यापूर्वीच त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य करण्यात आल्या असून, एका मागणीमध्ये कायदेशीर अडचण असल्याने ती मान्य करता आली नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले याचा मला आनंद आहे. आम्ही त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. एका मागणीमध्ये कायदेशीर अडचण असल्यामुळे ती मान्य करता आली नाही आणि त्याबाबत त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सरकारच्या उपसमितीने जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यासाठी आवश्यक बैठका घेणे, प्रशासकीय स्तरावर निर्णय घेणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे या सर्व गोष्टी सरकारकडून केल्या जातील. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक असून चर्चेसाठी सरकारचे दरवाजे नेहमीच खुले असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजासाठी आपल्या सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचाही दावा फडणवीस यांनी यावेळी केला.

20 दिवसांच्या उपोषणात मनोज जरांगेंनी काय मिळवलं? कोणत्या मागण्या मान्य, कोणत्या अजून प्रलंबित?

जरांगे पाटील यांचे उपोषण संपवण्यासाठी झालेल्या चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. जे काही मिळाले ते आमच्या सरकारच्या काळात मिळाले आहे. उपोषण संपल्याचा मला आनंद आहे. विखे पाटील, प्रसाद लाड आणि एकनाथ शिंदे यांनी यासाठी खूप मदत केली. कोणत्याही सणात विघ्न न येता हे आंदोलन संपले, याचाही आनंद आहे, असे फडणवीस म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छाही दिल्या. पंतप्रधान मोदी स्वतःचा वाढदिवस साजरा करत नसल्याचे सांगत, त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यात विविध सेवा उपक्रम राबवले जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. महिनाभर विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करून जनतेला आवश्यक सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची आगेकूच सुरू असून विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने देश वाटचाल करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

NSE चा 22,569 कोटींचा IPO खुला; गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद, अर्ध्या तासात 12 टक्के सबस्क्रिप्शन

दरम्यान, UPI पेमेंटवरील शुल्काच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करताना केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांनी प्रतिटिप्पणी केली. UPI संदर्भात केंद्र सरकारने अधिकृतपणे आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यावर वारंवार खुलासा करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.

भारताने विकसित केलेली UPI व्यवस्था आज अनेक देशांमध्ये वापरली जात असल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले. डिजिटल व्यवहारांमुळे सरकारी अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे शक्य झाले असून, त्यामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढल्याचा दावा त्यांनी केला. अशाप्रकारे जरांगे पाटील यांच्या उपोषणापासून UPI वरील राजकीय आरोप-प्रत्यारोपांपर्यंत विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

follow us