रोहित पवारांच्या पीएच्या 12 वर्षीय मुलीचा रहस्यमय मृत्यू; नेमकं काय घडलं?
Rohit Pawar’s PA daughter found dead बारामतीत आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली; पोलिसांकडून तपास सुरू.
Rohit Pawar’s PA daughter found dead in Baramati : बारामतीतील रुई परिसरात 12 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या मुलीचा हा मृतदेह असल्याची माहिती समोर आली आहे. मुलीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून तपासणी केली जात आहे.
रात्री घरातून निघून गेली होती मुलगी
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री आई आणि मुलीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर मुलगी घरातून बाहेर पडली. बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला आणि ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली.
हिंगोलीत कावड यात्रेत दोन डीजेंची भीषण धडक; रिव्हर्स घेत धडकवलेल्या वाहनांमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू
दरम्यान, सकाळच्या सुमारास घराच्या परिसरातच मुलीचा मृतदेह आढळून आला. तसेच तिच्या शरीरावर प्राथमिकदृष्ट्या सामान्य स्वरूपाच्या जखमा आढळल्या. त्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल
रुई येथील साई गणेश नगर परिसरात फॉरेन्सिक पथक दाखल झाले आहे. पथकाकडून घटनास्थळाची बारकाईने पाहणी करण्यात येत असून महत्त्वाचे पुरावे आणि नमुने संकलित केले जात आहेत. मृत्यूच्या परिस्थितीचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून घटनास्थळावरील प्रत्येक बाब तपासली जात आहे.
Tukaram Mundhe : महाप्रसादासाठी अधिकृत नोंदणी अनिवार्य; तुकाराम मुंढेंचा मोठा आदेश
मुलीचा स्वतःहून तिचे जीवन संपवले की, तिच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढणे टाळले जात असून तपासातील पुराव्यांच्या आधारेच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
या प्रकरणात मुलगी घरातून बाहेर पडल्यापासून सकाळी मृतदेह आढळेपर्यंतच्या कालावधीतील घटनाक्रम तपासला जात आहे. मुलगी आईच्या मोबाईलवरून एका मुलाशी बोलत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. मग संबंधित संशयित मुलाचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला. मोबाईलमधील माहितीच्या आधारे तपास सुरू आहे. तसेच परिसरातील माहिती, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर उपलब्ध बाबींच्या आधारे तपास सुरू आहे.
… तर भुजबळ तेव्हाच वर गेले असते; खैरे यांनी सांगितला थरार
रोहित पवार बारामतीत दाखल
दरम्यान, आमदार रोहित पवारांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट दिली. या घटनेबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील निष्कर्ष समोर आल्यानंतरच या घटनेमागील सत्य स्पष्ट होणार आहे. तसेच या घटनेमुळे दशावतारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
स्पेस क्षेत्रात करिअरच्या रोमांचक संधी; एमआयटी-डब्ल्यूपीयूत नॅशनल स्पेस डे चे आयोजन