महिला सहकाऱ्याशी गैरवर्तनानंतर बंगळुरूतील कंपनीचा अजब निर्णय; ‘या’ चार राज्यांतील पुरुषांना नोकरी देणार नाही!
Bengaluru Company Male Hiring Ban: A1 Sports World ने उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार व मध्य प्रदेशातील पुरुषांना नोकरी न देण्याची घोषणा केली.
Bengaluru Startup ‘A1 Sports World’ 4 State Male Hiring Ban: बंगळुरूतील एका उद्योजकाने केलेल्या एका निर्णयामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि मध्य प्रदेश या चार राज्यांतील पुरुष उमेदवारांना आपल्या कंपनीत नोकरी न देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
A1 Sports World चे संस्थापक कार्तिक एस.जी. यांनी सांगितलं की, एका माजी कर्मचाऱ्याने (जो या चार राज्यांपैकी एका राज्यातील होता) महिला सहकाऱ्यांसोबत कथित गैरवर्तन केल्याच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला. 22 सप्टेंबर रोजी केलेल्या पोस्टमध्ये कार्तिक यांनी लिहिलं की, “उत्तर भारतातील या चार राज्यांमधून येणाऱ्या कोणत्याही पुरुष उमेदवाराला आम्ही आमच्या कंपनीत नोकरी देणार नाही.” यामध्ये त्यांनी उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांचा उल्लेख केला.
माझी कंपनी, माझे नियम
कंपनीत राजस्थानमधील एक महिला कर्मचारी आधीपासून कार्यरत असून, तिनेही या निर्णयाला पाठिंबा दिल्याचा दावा कार्तिक यांनी केला. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. एखाद्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा संबंध त्याच्या राज्याच्या किंवा प्रदेशाच्या पार्श्वभूमीशी जोडणं योग्य आहे का, यावरून चर्चा सुरू झाली.
टीकेला उत्तर देताना कार्तिक यांनी “माझी कंपनी, माझे नियम” अशी भूमिका मांडली. कंपनी कशी चालवायची, याबाबत आपल्याला सल्ला देऊ नये, असंही त्यांनी एका टीकाकाराला उत्तर देताना म्हटलं.
‘लालबागच्या राजा’ची आज राजेशाही विसर्जन मिरवणूक; दुपारी 12 वाजता होणार सुरुवात
“अशी मानसिकता आणि विचारसरणी असलेल्यांना नोकरी द्यावी का?”
यानंतरच्या एका पोस्टमध्ये कार्तिक यांनी या निर्णयामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे दोन आठवड्यांपूर्वी चार राज्यांपैकी एका राज्यातील एका कर्मचाऱ्याला कंपनीतून काढण्यात आलं. महिला कर्मचाऱ्यांसोबत कथित गैरवर्तन केल्याबद्दल त्याला दोन वेळा इशारा देण्यात आला होता, मात्र त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही, असा दावा त्यांनी केला.
Im sorry for this…
But today we have made it very clear after lengthy discussion and quarrel…
We will not hire any male candidates in our company who come from these 4 states in north india…
1. Uttar Pradesh.
2. Rajasthan.
3. Bihar.
4. Madhya Pradesh.We do have 1…
— Karthik SG (@kkarthikkgs) September 22, 2026
कार्तिक यांनी पुढे संबंधित कर्मचाऱ्यावर एका महिला कर्मचाऱ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप केला. हे आरोप कार्तिक यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून केले असून, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
एसआयआर प्रकरणानंतर मोठी राजकीय घडामोड, ज्ञानेश कुमारांविरोधात ‘महाभियोग’ प्रस्तावाची तयारी
अशा प्रकारची “मानसिकता आणि विचारसरणी” असलेल्या व्यक्तींना रोजगाराची संधी द्यावी का, असा सवालही कार्तिक यांनी उपस्थित केला. आपल्या कंपनीत तुलनेने कमी वयाच्या मुलांसोबत काम केलं जात असल्याचं त्यांनी नमूद केलं.
‘आम्ही समान संधीवर विश्वास ठेवतो’
कार्तिक यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कंपनीत एकूण 32 कर्मचारी असून त्यापैकी 14 महिला आहेत. कंपनीतील 20 कर्मचारी इतर राज्यांमधून आलेले असून, त्यापैकी 12 जण दक्षिण भारताबाहेरील राज्यांतील असल्याचा त्यांनी दावा केला.
चार राज्यांतील पुरुष उमेदवारांना नोकरी न देण्याचा निर्णय हा सर्वसाधारणपणे एखाद्या समूहाला दोषी ठरवण्यासारखा असल्याची टीका झाल्यानंतर कार्तिक यांनी कंपनी समान संधीच्या तत्त्वावर विश्वास ठेवत असल्याचं म्हटलं. लिंग, जात किंवा धर्माच्या आधारावर भेदभाव केला जात नसल्याचा दावा त्यांनी केला. कंपनीत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख आणि बौद्ध धर्मीय कर्मचारीही असल्याचा त्यांनी उल्लेख केला.
‘मेरी एक टांग नकली है…’ म्हणत प्रेक्षकांना हसवणारे ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान काळाच्या पडद्याआड
कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबतच्या चिंतेमुळे हा निर्णय घेतल्याचं कार्तिक यांनी स्पष्ट केलं.