‘रोहित पवारांनी उतावळेपणाने आरोप करू नयेत’; विखे पाटलांचा थेट टोला,‘शेतकऱ्यांना कुकडीचं पाणी मिळणं महत्त्वाचं

Vikhe Patil On Rohit Pawar: दुष्काळावर टीका करताना रोहित पवारांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्यावं, असा सल्ला राधाकृष्ण विखे यांनी दिला.

Radhakrishna Vikhe Patil On Rohit Pawar

Radhakrishna Vikhe Patil On Rohit Pawar: आमदार रोहित पवार यांनी राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करताना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भूमिका मांडावी, असा सल्ला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. दुष्काळाच्या परिस्थितीत राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा शेतकरी आणि नागरिकांना आवश्यक मदत कशी मिळेल, यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना घाबरता तर दौरे रद्द करा…मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा

‘रोहित पवारांनी उतावळेपणाने आरोप करू नयेत’

रोहित पवार हे तरुण आमदार आहेत. त्यामुळे कोणताही आरोप करण्यापूर्वी आपण काय बोलत आहोत, याचा विचार त्यांनी करायला हवा, असं विखे पाटील म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविडच्या संकटाचा सामना करताना शेतकरी आणि नागरिकांच्या अडचणी काय होत्या, याचाही विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला.

‘कुकडीचं पाणी शेतकऱ्यांना मिळणं महत्त्वाचं’

कुकडीच्या पाण्यावरून श्रेयवादाची लढाई करण्यापेक्षा संबंधित भागातील शेतकरी आणि नागरिकांना पाणी मिळणं महत्त्वाचं आहे, अशी भूमिका विखे पाटील यांनी मांडली. कुकडीच्या पाण्याचं श्रेय ज्याला घ्यायचं असेल त्याने घ्यावं, आम्हाला त्याची चिंता नाही; मात्र शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पुणेकरांनो, गणेश विसर्जनाची माहिती आता एका क्लिकवर; मिरवणुकीचे मार्ग, ट्रॅफिक डायव्हर्जन आणि पार्किंगची माहिती मिळणार

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत. दुष्काळसदृश्य स्थिती मान्य करण्यात आली असून पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक मुद्द्याचं राजकीय भांडवल करण्याची आवश्यकता नसल्याचंही विखे पाटील यांनी सांगितलं.

‘टीका सुरू राहिली तरी सरकारचं काम थांबणार नाही’

सरकारवर कितीही टीका झाली तरी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या कामावर त्याचा परिणाम होणार नाही, असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. दुष्काळी परिस्थितीत आवश्यक त्या उपाययोजना सुरू असून शेतकऱ्यांना आधार देण्याची सरकारची भूमिका कायम आहे. आंदोलनाचा इशारा दिला तरी सरकारच्या कामकाजात कोणताही बदल होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.

डिंभे-माणिकडोह प्रकल्पाबाबत विखे पाटलांचं स्पष्टीकरण

डिंभे-माणिकडोह बोगदा प्रकल्पाला स्थगिती देण्यात आल्याची चर्चा चुकीची असल्याचं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. प्रकल्पाला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नसून बोगद्याच्या पातळीशी संबंधित काही मुद्दे समोर आले आहेत. त्यावर आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘लालबागच्या राजा’ची आज राजेशाही विसर्जन मिरवणूक; दुपारी 12 वाजता होणार सुरुवात

अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असून तो पूर्ण करण्याची जबाबदारी जलसंपदा मंत्री म्हणून आपली आहे. प्रकल्पाचं काम लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाहीही विखे पाटील यांनी दिली.

follow us