पहिल्याच ओव्हरमध्ये बुमराहचा भेदक मारा; न्यूझीलंडच्या कॅप्टनचा स्टम्पच उडवला, टीम इंडियाची धडाकेबाज सुरुवात!

India vs New Zealand 1st Test; भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय बॉलर्सनी दमदार सुरुवात केली आहे.

India vs New Zealand 1st Test

India vs New Zealand 1st Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय बॉलर्सनी दमदार सुरुवात केली आहे. कॅप्टन शुभमन गिलने (Shubhaman Gill) टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराहसह (Jasprit Bumrah) भारतीय फास्ट बॉलर्सनी सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या बॅटर्सवर दबाव निर्माण केला. पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत न्यूझीलंडने 23 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावत 60 रन्स केले होते.

‘याच्या बॅगेत गांजा टाक…’ प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये थांबलेल्या तरुणाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी? पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल

वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह मैदानावर गुरुवारी (19 नोव्हेंबर) या टेस्ट मॅचला सुरुवात झाली. बुमराहने डावाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथमला (Tom Latham) आऊट करत भारताला पहिले यश मिळवून दिले. लॅथमला खातेही उघडता आले नाही. गिलचा बॉलिंग करण्याचा निर्णय बुमराहने पहिल्याच ओव्हरमध्ये योग्य ठरवला.

बुमराहच्या भेदक बॉलिंगवर लॅथम क्लीन बोल्ड

बुमराहने टॉम लॅथमला अप्रतिम बॉलवर क्लीन बोल्ड केले. त्याने टाकलेला बॉल वेगाने आतल्या बाजूला वळला. बॉल सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या लॅथमचा अंदाज चुकला आणि बॉल थेट ऑफ स्टम्पवर जाऊन आदळला. त्यामुळे न्यूझीलंडचा कॅप्टन शून्यावरच पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅचच्या सुरुवातीलाच कॅप्टनची विकेट गेल्याने न्यूझीलंड टीमवर दबाव निर्माण झाला.

लॅथमने सेहवागच्या नकोशा रेकॉर्डशी केली बरोबरी

पहिल्याच ओव्हरमध्ये शून्यावर आऊट झाल्यामुळे टॉम लॅथमच्या नावावर आणखी एका नकोशा रेकॉर्डची नोंद झाली. टेस्ट क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट होणाऱ्या बॅटर्सच्या यादीत त्याने भारताचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवाग याची बरोबरी केली आहे. दोघेही या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.

2035 पर्यंत इस्लाम जगातील सर्वात मोठा धर्म ठरणार; ख्रिश्चन धर्मालाही मागे टाकणार, प्यू रिसर्च सेंटरचा अंदाज!

या यादीत वेस्ट इंडिजचा क्रेग ब्रॅथवेट 19 वेळा शून्यावर आऊट होऊन पहिल्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा माजी कॅप्टन माईक अ‍ॅथर्टन 17 वेळा, तर श्रीलंकेचा मारवान अटापट्टू 16 वेळा शून्यावर आऊट झाला आहे.

बेसिन रिझर्व्ह मैदानावर भारताला विजयाची प्रतीक्षा

वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह मैदानावर भारतीय टीमला विजय मिळवण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. भारताने या मैदानावर शेवटचा टेस्ट विजय फेब्रुवारी 1968 मध्ये मिळवला होता. त्यामुळे यंदा हा जुना रेकॉर्ड बदलण्याची संधी भारतीय टीमकडे आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसह नांदेडमधील चार आमदारांना जीवे मारण्याची धमकी; मुंबईतून एकजणाला अटक

दुसरीकडे, 2009 नंतर भारतीय टीमला न्यूझीलंडच्या भूमीवर टेस्ट मॅच जिंकता आलेली नाही. त्यामुळे या मॅचमध्ये भारतीय बॉलर्सनी मिळवून दिलेली सुरुवात भारतीय बॅटर्स कशी पुढे नेतात आणि टीम इंडिया हा इतिहास बदलते का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

 

follow us