माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या तब्येतीबाबत चिंताजनक; चाहत्यांची चिंता वाढली

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनोद कांबळीला ब्रेन स्ट्रोकचा धोका असल्याचं म्हटलं जात आहे.

News Photo   2026 04 15T212737.421

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि सचिन तेंडुलकरचा जिगरी मित्र विनोद कांबळी याच्या तब्येतीबाबत चिंताजनक (Kambli) माहिती समोर आली आहे. विनोद कांबळी गेल्या अनेक वर्षांपासून प्रकृतीसोबत झगडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कांबळीला गंभीर आजाराचा धोका आहे. कांबळीला फार काही आठवत नसल्याचं म्हटलं जात आहे. कांबळीला औषध घेण्याची आठवण राहत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! 20 लाख लाडक्या बहि‍णींना मिळणार हक्काची घरं

आपला मित्र बरा व्हावा यासाठी काही महिन्यांआधी माजी खेळाडूंनी एकत्र येत कांबळीच्या उपचारांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. तसंच, राज्य सरकारनेही माजी क्रिकेटपटूला मदत केली होती. त्यानंतर कांबळीच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनोद कांबळीला ब्रेन स्ट्रोकचा धोका असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे संभाव्य धोका पाहता कांबळीचे क्रिकेटपटू मित्र पुन्हा एकदा एक्शन मोडमध्ये आले आहेत. कांबळीच्या मित्रांनी आणि क्रिकेटपटूंनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आवश्यक उपचारांसाठी आर्थिक मदत करता यावी या हेतूने व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये सचिन तेंडुलकर असल्याचंही म्हटलं जात आहे.

follow us