गोकुळच्या निकालात ऐनवेळी ट्विस्ट, तरी सतेज पाटलांनी बाजी मारली, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी समोर
गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीत एका जागेसाठी फेरमतमोजणी झाल्यानंतर सतेज पाटील यांच्या आघाडीची एक जागा घटली असून महायुतीची जागा वाढली.
Gokul Dairy Election Result : कोल्हापूरच्या गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीचा निकाल समोर येत असताना मतमोजणीत मोठा बदल झाला आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे उमेदवार १५ जागांवर आघाडीवर होते. मात्र, एका जागेसाठी फेरमतमोजणी झाल्यानंतर निकालाचं चित्र बदललं. अंतिम आकडेवारीनुसार समविचारी आघाडीला १३ जागा मिळाल्या, तर महायुतीसमर्थित पॅनेलचे १२ उमेदवार विजयी झाले. त्यामुळे सुरुवातीला आघाडीवर असलेल्या सतेज पाटील यांच्या पॅनेलला एका जागेचा फटका बसला आहे.
फेरमतमोजणीमध्ये समविचारी आघाडीचे सचिन घोरपडे यांना पराभव स्वीकारावा लागला, तर महायुतीचे अमर पाटील विजयी ठरले. या निकालानंतर सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली असून, मतमोजणीला जाणीवपूर्वक उशीर केला जात असल्याचा आरोप केला आहे. या घडामोडींमुळे गोकुळच्या निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात राजकीय वातावरण तापलं आहे. मात्र, १३ जागा मिळवणाऱ्या समविचारी आघाडीकडे सत्तेसाठी आवश्यक असलेलं बहुमत असल्याचं सांगितलं जात असून, गोकुळचा पुढील कारभार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विजयी उमेदवारांची यादी
सर्वसाधारण गट
1. अभिजित प्रभाकर तायशेटे (सतेज पाटील)
2. शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर (सतेज पाटील)
3. राहुल पांडुरंग पाटील (महायुती)
४ चेतन अरुण नरके (महायुती)
५ अजित शशिकांत नरके (महायुती)
६ किसन बापूसो चौगले (सतेज पाटील)
७ अंबरीषसिंह संजय घाटगे (महायुती)
८ बाबासाहेब श्रीपती चौगले (सतेज पाटील)
९ राहुल बजरंग देसाई (सतेज पाटील)
१० विद्याधर बाबुराव गुरबे (सतेज पाटील)
११ विरेंद्र संजय मंडलिक (महायुती)
१२ मदन बाबुराव देसाई (महायुती)
१३ बाबासाहेब विष्णू देवकर (सतेज पाटील)
१४ राजेश नरसिंगराव पाटील (महायुती)
१५ रणजितसिंह दिलीपराव पाटील (महायुती)
१६ रणजितसिंह कृष्णराव पाटील (महायुती)
१७ अजित पांडुरंग पाटील (महायुती)
१८ कर्णसिह गायकवाड (महायुती )
१९ विश्वजीत दिनकरराव जाधव (सतेज पाटील)
२० अमर पाटील कोडोली (महायुती)
महिला राखीव गट
1. अंजना केदारी रेडेकर (सतेज पाटील)
2. भाग्यश्री धीरज डोंगळे (सतेज पाटील)
इतर मागासवर्गीय गट
1. शशिकांत शामराव खोत (सतेज पाटील)
अनुसूचित जाती गट
1. राजू बाबा आवळे (सतेज पाटील)
भटक्या-विमुक्त जमाती गट
1. बयाजी शेळके (सतेज पाटील) २. ..
…..
समविचारी आघाडी (सतेज पाटील) – 13 महायुती – 12