विद्यानंद बापट यांच्यावर गुन्हा दाखल करा; हिंदू सेवा संघाची मागणी

Vidyanand Bapat गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये केल्याचा आरोप हिंदू सेवा संघाने केला.

Vidyanand Bapat

Hindu Seva Sangh Seeks FIR Against Vidyanand Bapat: हिंदू धर्माच्या भावना दुखावणारी वक्तव्ये केल्याचा आरोप करत विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हिंदू सेवा संघाने (Hindu Seva Sangh) केली आहे. यासंदर्भात संघाचे अध्यक्ष रोहित रमेश मारणे यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे लेखी निवेदन देत तक्रार दाखल केली.

Santosh Chavan : केवळ गणेशोत्सव दिसतो का? बापटांना मारहाण करणारा संतोष चव्हाण नेमका कोण?

पुण्यातील रहिवासी असलेल्या विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवाच्या (Ganesh Festival) पार्श्वभूमीवर हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये केल्याचा आरोप हिंदू सेवा संघाने केला आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे समाजात अस्वस्थता आणि तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही संघाने तक्रारीत म्हटले आहे.

विद्यानंद बापटांना मारहाण म्हणजे पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण; रोहित पवार भडकले

बापट यांनी “मी बहुमत मानत नाही” अशा स्वरूपाचे वक्तव्य केल्याचा दावा संघाकडून करण्यात आला आहे. या वक्तव्याचा संबंध भारतीय लोकशाही व्यवस्था, संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या लोकशाही व्यवस्थेशी जोडत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी संघाने केली आहे.

‘तू जे घातलंय तेच सिनेमात घाल’; सैफ अली खानचा रिअल लाइफ लूक पाहून प्रियदर्शन झाले इम्प्रेस

धार्मिक भावना दुखावणे, समाजात अस्वस्थता निर्माण करणे तसेच संविधान आणि लोकशाही व्यवस्थेचा अवमान केल्याच्या आरोपांची चौकशी करून विद्यानंद बापट यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदू सेवा संघाने कोथरूड पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, या तक्रारीवर पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

follow us